एक अनोखा हटके सोहळा- गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा

आगळ्यावेगळ्या ठरणा-या या पुरस्कार सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे.येत्या 31 जानेवारीला जे. डब्ल्यु.मॅरिएट (जुहू)या पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

एक अनोखा हटके सोहळा- गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा
Published: 27 Jan 2017 02:08 PM  Updated: 27 Jan 2017 02:08 PM

महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाच्या लोकमत समूहाने महाराष्ट्रीय समाजातील एक स्टायलिश पैलु प्रथमच हेरला आहे.त्याचाच एक भाग म्हणून मोस्टर स्टायलिश अवॉर्डचे आयोजन केले जात आहे.मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमत समूहाच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या  मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे.मराठी चित्रपटसृष्टी,बॉलिवूड किंवा मग टीव्ही,फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते.या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.

बॉलिवू़डमधील हँडसम हंग हृतिक रोशन,स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर, राधिका आपटे, सोनाली बेंद्रे, दिनो मौर्या,उपेन पटेल, गुलशन ग्रोव्हर, गायिका शाल्मली खोलगडे, पहलाज निहलानी, अक्रीती कक्कर या बॉलिवूड सेलिब्रेटींची उपस्थिती असणार असून यासह मराठी सिनेसृष्टतील वाजले की बारा फेम अभिनेत्री अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी,  प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर-कोठारे, अभिनेता अजिंक्य देव, देवदत्त नागे, नेहा पेंडसे, प्रार्थना बेहरे, श्रुती मराठेसह चित्रपटसृष्टीतील कलाकरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता सुयश टिळक या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे आगळ्यावेगळ्या ठरणा-या या पुरस्कार सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे.येत्या 31 जानेवारीला जे. डब्ल्यु.मॅरिएट (जुहू) हा पंचतारांकित हॉटेल मध्ये संध्याकाळी 7 वाजता अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :