आज होणार महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डने स्टायलिश पर्सनालिटीजचा गौरव

आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या या सोहळ्यात बॉलीवुड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. या सोहळ्यात अभिनेता आणि सुपरस्टार हृतिक रोशनची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच स्टाइल आयकॉन सोनम कपूरचाही घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळणार आहे.

आज होणार महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डने स्टायलिश पर्सनालिटीजचा गौरव
Published: 31 Jan 2017 12:25 PM  Updated: 31 Jan 2017 02:06 PM

कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. या सोहळ्यासाठी RED FM रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि ABP माझा हे टीव्ही पार्टनर आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तीमत्त्व याला नव परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा रंगणार आहे. आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

या सोहळ्यात अभिनेता आणि सुपरस्टार हृतिक रोशनची प्रमुख उपस्थिती असणार आहे.नेहमीच हृतिकचा लूक तरुणाई आणि रसिकांवर जादू करतो. त्यामुळे या सोहळ्यात हृतिक डॅशिंग लूकमध्ये रेड कारेपटवर अवतरणार आहे. नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा या सोहळ्याला चारचाँद लावणार आहे. स्टाइल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. त्यामुळे या स्टाइलिश अवॉर्डमध्ये सोनमचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळणार आहे.सोकुल अशी मराठी चित्रपटसृष्टीत ओळख असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकणीर्ने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलीय. सोनालीच्या अभिनयासोबतच तिची स्टाइलसुद्धा तितकीच कुल असते. त्यामुळे मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्यात सोनालीचाही आकर्षक लूक पाहायला मिळणार आहे.तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी टायगर श्रॉफची ओळख.आपली अनोख्या स्टाइलनं आणि डान्सिंग स्टाइल यामुळे टायगर यंग जनरेशनच्या गळ्यातला ताईत बनला आहे. टायगरप्रमाणे स्टाईल असावी, त्याला फॉलो करावं अशी तरुणाईची इच्छा असते. दैनिक लोकमत आयोजित मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याला टायगर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्याच्या स्टाइलकडे तरुणाईच्या नजरा असतील.मराठी आणि बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता तसंच दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर. त्यांची स्टाइल आणि फॅशन कुणाच्याही नजरा आकर्षित करते. विविध सोहळे, पार्ट्यांमध्ये महेश मांजरेकर यांची स्टाइलही लक्ष वेधून घेणार हे मात्र नक्की.

रूपेरी पड्दयावर विविधारंगी भूमिका साकारुन अभिनेत्री राधिका आप्टेने रसिकांची मनं जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाईलही खास असते.या पुरस्कार या सोहळ्यात राधिकाचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हजेरी लावणार आहे. याशिवाय या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्यात अजिंक्य रहाणेची उपस्थितही आकर्षण ठरणार आहे.याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रियांका बर्वे, शाल्मली खोलगडे, महेश कोठारे, साजिद नाडीयावाल, मिथीला पालकर, राणा कपूर, अतुल कसबेकर,मलिष्का, गौतम सिंघानिया, हनुमंत गायकवाड, नितीन जाधव, अरूण लखानी, अभय जोशी, अजिंक्य पाटील,ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, गुलशन ग्रोव्हर, डिनो मोर्या, सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचीही उपस्थिती असणार आहे.या सेलिब्रिटींच्या फॅशन स्टाइल, फॅशन स्टेटमेंटकडे साऱ्यांच्या नजरा असतील. आज होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची बिंत्तमबातमी जाणून घेण्यासाठी भेट द्या  www.lokmat.com आणि www.cnxmasti.com या संकेतस्थळावर.तसेच आज रात्री 8.30 वाजता हा साोहळा लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या लिंक वर http://www.lokmat.com/MMS-awards-2017-live/
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :