LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS: सेलिब्रेटींच्या उपस्थित पार पडला सर्वात स्टायलिश अवॉर्ड सोहळा

मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा मंगळवारी (दि. ३१) मोठ्या दिमाखात पार पडला. सोहळ्यात केवळ मान्यवरांच्या ‘स्टाइल’विषयीच नव्हे तर त्यांच्या यशाचाही यावेळी गौरव करण्यात आला.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS: सेलिब्रेटींच्या उपस्थित पार पडला सर्वात स्टायलिश अवॉर्ड सोहळा
Published: 01 Feb 2017 01:44 AM  Updated: 02 Mar 2017 12:07 PM

ग्लॅमर, उद्योग अन् फॅशनच्या जगतात वावरत असताना तुमची ‘स्टाइल’च तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. कारण यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होत असतानाच तुम्हाला फॉलो करणारा वर्गही तुमच्या यशाबरोबरच तुमच्या स्टाइलविषयी जाणून असतो. महाराष्ट्रातील अशाच काही स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेत त्यांना सन्मानित केले आहे.
मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा  मंगळवारी (दि. ३१) मोठ्या दिमाखात पार पडला. सोहळ्यात केवळ मान्यवरांच्या ‘स्टाइल’विषयीच नव्हे तर त्यांच्या यशाचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या सोहळ्यासाठी प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, रेड एफएम रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे टीव्ही न्यूज पार्टनर होते. अतिशय दैदीप्यमान अशा या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतातील कलाकारांचा स्टायलिश अवॉर्डने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर फॅशन तसेच उद्योगजगतातील स्टायलिश मान्यवरांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विविध क्षेत्रातील अनेक दिग्गद मान्यवर मंडळी लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात आवर्जुन उपस्थित होते. त्यामध्ये राजकीय क्षेत्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, गौतम सिंघानिया, हृतिक व राकेश रोशन, आशुतोष गोवारीकर, जितेंद्र, सोनम कपूर, ऋषी कपूर, महेश मांजरेकर यांसह अनेक हिंदी व मराठी मनोरंजन विश्वातील सिलेब्रिटी तसेच ‘लोकमत’चे चेयरमन विजय दर्डा, इडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकिय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा, सखी मंचच्या संस्थापकीय अध्यक्ष आशू दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा उपस्थित होते.

अनोख्या सोहळ्यात सामील होण्यासाठी सायंकाळी एक एक सेलिब्रेटींचे आगमन होण्यास सुरूवात झाली. रेड कार्पेटवर गुलशन ग्रोव्हर, अजिंक्य रहाणे, साई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांच्या सह अनेक सेलिब्रिटीचा जलवा बघावयास मिळाला. ​ गुलशन ग्रोव्हरने आपल्या "बॅड मॅन" अँटिट्यूडसह एन्ट्री घेतली. क्रिकेट पटू अजिंक्य राहणे सूटमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता.

Gulshan

मराठीतील आघाडीची तारका साई ताम्हणकर पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अमृता खानविलकर हिची एंट्री विषेश आकर्षनिय ठरली. बॅकलेस वनपीस ड्रेस मध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये आलेल्या महेश मांजरेकरांच्या हेअरस्टाईलचे कौतुक करण्यापासून गुलशन ग्रोव्हर स्वत:ला रोखू शकला नाही. स्टाईल अवॉर्ड्स असल्यामुळे प्रत्येक जण फॅशनेबल वेशभूषेत आले होते. वर्षातील सर्वात स्टायलिश सायंकाळ म्हणून आजच्या सोहळ्याचे वर्णन करावे लागेल.

लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी उपस्थित पाहुणे व सत्कारमुर्तींचे स्वागत केले. संबोधित करताना त्यांनी ‘लोकमत’ची भूमिका मांडताना या सोहळ्यांची संकल्पना स्पष्ट केली. उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा त्यांनी शब्दसुमनांनी गौरव केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यासाठी नागपूरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्याी घोषणा केली. स्टाईल काय असते हे स्पष्ट करताना ते म्हणाले की, स्टाईल केवळ कपड्यात नसते ती व्यक्तीच्या कर्तृत्वात असते. त्या अर्थाने विविध क्षेत्रात छाप पाडणारे सर्व मान्यवर स्टाईलशिलश आहेत.​

फुलवा खामकर आणि ग्रुपने ‘गणेश वंदने’ने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके कलाकार सुयश टिळक आणि क्रांती रेडकर यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चे सुत्रसंचालन केले.

अवॉर्ड्सचे मानकरी: 

हृतिक रोशन

आपल्या हटके डान्स शैलीने तरुणांचे मने जिंकणारा अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. नेहमीच काही तरी हटके स्टाइल करून चर्चेत राहणारा हृतिकची एक झलक त्याच्या फॅन्ससाठी पर्वणीच ठरत असते. नुकताच रिलिज झालेल्या त्याच्या ‘काबील’ या सिनेमातील त्याची स्टाइल हल्ली  तरुणार्इंमध्ये फॉलो केली जात आहे.

Hrithik

त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला.

पुरस्कारासाठी लोकमतचे आभार व्यक्त करताना हृतिक म्हणाला की, ‘स्टाईल म्हणजे कंफर्ट आणि आत्मविश्वासावर अवलंबुन असते. तुम्ही ज्या वेशभुषेमध्ये कंफर्टेबल आणि कॉन्फिडन्स असतात तीच तुमची स्टाईल.’​


सोनम कपूर

इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजक्या अ‍ॅक्ट्रेस त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यातील एक नाव म्हणजे सोनम कपूर होय. नेहमीच काही तरी वेगळी स्टाइलकरून लाइमलाइटमध्ये राहणारी सोनम स्टाइल आयकॉन म्हणून समोर येत आहे. त्याचबरोबर स्टाइल दिवा म्हणून सोनमने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Sonam Kapoor

कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. सोनमचा हाच स्टाइल सेन्स हेरून तिला ‘मोस्ट स्टायलिश अभिनेत्री’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 

आर. जे. मलिष्काने सोनम कपूर आणि अतुल कसबेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा चित्रपट ‘नीरजा’ची पडद्या मागची कहाणी सांगितली. जर सोनम अभिनेत्री नसती तर ग्रंथपाल झाली असती, असे ती म्हणाली. सोनमची पहिले क्रश सलमान खान होता. ‘ओ ओ जाने जाना’ गाण्यावर नाचताना सलमानला पाहिल्यावर ती त्याच्या प्रेमात पडली होती. सोनमला वाटते की, इंडस्ट्रीमधील सर्वात स्टाईलिश अ‍ॅक्टर इम्रान खान, कल्की कोचलिन आहेत.
टायगर श्रॉफ

Tiger

डान्स, बॉडी, अ‍ॅक्टिंग आणि स्टाइल असे सर्वगुण असलेला अभिनेता टायगर श्रॉफ हा अल्पावधितच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. खरं तर टायगर सध्या यंग जनरेशनसाठी ‘स्टाइल आयकॉन’ ठरत आहे. टायगर श्रॉफच्या या स्टाइलचा गौरव करण्यासाठी त्याला लोकमतने ‘मोस्ट स्टायलीश अभिनेता’ या अवॉर्डने गौरविले आहे. टायगरला हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘लोकमत’ व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र दर्डा हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी टायगर आणि हृतिक रोशन यांनी ‘बँग बँग’ गाण्यावर ठेका धरला आणि यावेळी उपस्थितांनी एकाच जल्लोष केला.​
आशुतोष गोवारीकर

Ashutosh

बॉलिवूडला आॅस्करपर्यंत नेणारे आणि वैविध्यपूर्ण विषय घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्यांच्या ‘लगान’ या सिनेमाने आॅस्करपर्यंत झेप घेत नवा इतिहास निर्माण केला होता. त्यानंतर ‘स्वदेस, जोधा अकबर, मोहेंजोदडो’ असे दजेर्दार सिनेमांची आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केली आहे.

त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर’ हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशुतोष गोवारीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वप्निल जोशी

Swapnil Joshi

छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत घराघरात पोहचलेला आणि आजच्या तरुणाईचा मराठमोळा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाइलने स्वप्नीलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. स्वप्नीलच्या याच लोकप्रियतेमुळे तो ‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 
अमृता खानविलकर

‘वाजले की बारा’ म्हणत आपल्या नृत्याने रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या डान्ससोबतच अभिनय आणि स्टाइलने अमृताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाइलवर फिदा असतात. अमृताला ‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ या अवॉर्डने गौरविण्यात आले. जयंत म्हास्कर आणि संजय उपाध्याय यांच्या हस्ते अमृताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

यावेळी अमृतासाठी एक स्पेशल सरप्राईज होते. सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना स्टेजवर बोलावण्यात आले.  मग मांजरेकरांनी या दोन स्टायलिश अभिनेत्रींचा क्लास कम इंटरव्ह्युव घेतला. मांजरेकरांनी सई आणि अमृताला स्टाईल विषयी प्रश्न विचारले. ​सई ताम्हणकर म्हणते, सोनम कपूर माझी फॅशन आयकॉन आहे. अमृताही खूप स्टाईलिश आहे. ​

Amruta sai

सईसाठी रितेश देशमुख सर्वात स्टाईलिश अभिनेता आहे तर अमृताला अंकुश चौधरी मोस्ट स्टाईलिश वाटतो. ​जेव्हा महेश मांजरेकरांनी त्यांना विचारले की, हिंदीमध्ये कोणता मराठी अभिनेता चांगले करिअर घडू शकतो तेव्हा दोघींनी उत्तर दिले की, अमेय वाघ, वैभव तत्ववादी, सुबोध भावे हे मराठी कलाकार खरोखरंच हिंदीमध्ये मोठे नाव कमवू शकतात.

मांजरेकरांनी  गॉसिप होस्टची भूमिका निभावत मग दोन्ही अभिनेत्रींना काही मसालेदार प्रश्न विचारले. ‘हेल्थी डेट’साठी कोणासोबत जायला आवडेल या प्रश्नावर सई म्हणाली की, मला अजिंक्य रहाणेसोबत डेटवर जायला आवडेल. अमृता म्हणाली की, मी रणवीर सिंगची सर्वात मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत मी कधीही डेटवर जायला तयार आहे.
राधिका आपटे

अल्पवधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारुन अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडच नव्हे तर जगभरातील रसिकांची मने जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाइलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर आहेत.

Radhikas

राधिकाच्या या लोकप्रियतेमुळे तिला ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राधिकाला हा पुरस्कार सौरभ गाडगीळ आणि गौतम सिंघानिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राधिकाच्या आगामी ‘बॉम्बेरिया’ सिनेमाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला.​
सोनाली बेंद्रे​

soanli

बॉलीवुडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले. छम छम करता हैं... या अगं बाई अरेच्चा सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चयार्चा सुखद धक्का दिला. सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाइलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. त्यामुळेच सोनालीला या पुरस्कार सोहळ्यात ‘मोस्ट स्टायलिश आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा काकडे यांनी सोनालीचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
साजिद नाडियाडवाला

साजिद नाडियाडवाला यांना त्यांच्या विशिष्ट सिनेमांसाठी ओळखले जाते. सद्यस्थितीत त्यांचे इंडस्ट्रीमधील स्थान महत्त्वपुर्ण असून, फॅन्सनाही नेहमीच त्यांच्या सिनेमाची आतुरता असते. अशा या मोस्ट स्टायलिश निर्माता'' आणि दिग्दर्शकाला सोहळ्यात ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साजिद नाडियाडवाला यांना हा पुरस्कार प्रताप दिगावकर आणि सज्जन जिंदाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शाल्मली खोलगडे

‘इश्कजादे’ या सिनेमातील ‘मैं परेशान परेशान...’ या गाण्यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी मराठमोळी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे. पदार्पणातच सर्वोत्कृष्ट गायिका या कॅटेगिरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी शाल्मली तिच्या स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. आपल्या सूरांनी शाल्मलीने रसिकांवर मोहिनी घातली आहे. शाल्मलीच्या या लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी तिला ‘मोस्ट स्टायलिश गायिका’ या अवॉर्डने गौरवण्यात आले. संजय सेठी यांच्या हस्ते शाल्मलीला हा पुरस्कार देण्यात आला.
महेश कोठारे

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अशी ओळख निर्माण करत रसिकांचे फेव्हरेट बनलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे महेश कोठारे. मराठीमध्ये धुमधडाका', दे दणादण, 'थरथराट', धडाकेबाज, पछाडलेला, माझा छकुला अशा एकाहून एक सरस सिनेमा देणारे महेश कोठारे. आपल्या अभिनयासोबतच दिग्दर्शनाने त्यांनी चित्रपटसृष्टीत एक नवी उंची गाठली आहे.

आजही त्यांचा उत्साह आणि कामाचा आवाका तरुणांनाही लाजवेल असाच असतो. त्यांच्या याच असामान्य कर्तृत्वाची दखल घेत या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे यांना ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरवण्यात आले. लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते महेश कोठारे यांना हा पुस्कार प्रदान करताच उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.
आदित्य ठाकरे

युवासेनेच्या माध्यमातून तरुणाइचे संघटन करताना त्याच्या व्यक्तिमत्त्वातचाही विचार करणारा युवा नेता आदित्य ठाकरे यांचे स्टाइलविषयींचे परफेक्शनदेखील जबरदस्त आहे. त्यामुळेच ते त्यांच्या लूकमुळे कायम चर्चेत असतात.  राजकारणाचं व्यासपीठ असो इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो प्रत्येकवेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळते.

राजकारण्यांसह विद्यार्थ्यांमध्येही आदित्य ठाकरेंची प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना हा पुरस्कार ऋषी कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ऋषी कपूर यांनी विजय दर्डाजींना त्यांची आत्मकथा ‘खुल्लम खुल्ला’ भेट दिली.

Aditya

सहव्यवस्थापकिय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी सर्वांसमक्ष मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी  त्यांनी कोणत्या मुलीला डेट करायला आवडेल, लाईफ पार्टनर कशी पाहिजे अशा अनेक ‘बाउन्सर’ प्रश्नांची उत्तरे दिले. सोनम कपूर, अतुल कसबेकर, अजिंक्य रहाणे हे तीन लोक आदित्यला सर्वात स्टायलिश वाटतात.

स्वत:ला रईस मानतो की, काबील समजतोस या प्रश्नावर तो म्हणाला की, मला पडद्यामागचा कलाकार व्हायला आवडेल. ‘मेजर साहब’ आणि ‘टायटॅनिक’ पाहुन आदित्य रडला होता.  अशाप्रकारे दोघांमधील सवांद सोहळ्यात रंगत आणणारा ठरला. काही प्रश्नांवरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
अजिंक्य राहणे

ज्याला भविष्यातील द वॉल अर्थात राहुल द्रविड म्हणून संबोधले जाते असा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन म्हणजे मराठमोळा अजिंक्य रहाणे. अल्पावधीत अजिंक्यने आपल्या नावाला सार्थ ठरवत सरस खेळी करुन क्रिकेट विश्वात नवी ओळख निर्माण केलीय. बड्या क्रिकेटर्सच्या उपस्थितीतही भारतीय क्रिकेट विश्वात अजिंक्य नावाचा तारा चमकतो आहे.

ajinkya

त्यामुळेच त्यांच्या खेळीचे आणि अफलातून फिल्डिंगचे फॅन्सही तितकेच आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्यात अजिंक्यला ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्पोर्टपर्सन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. गौतम सिंघानिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन अजिंक्यचा सन्मान करण्यात आला.

मराठीतून भाषण करताना तो म्हणाला, की, प्रत्येक पुरस्कार मला प्रोत्साहित करतो. हा स्टाईल अवॉर्डही मला मैदानाबाहेर अधिक स्टायलिश राहण्यास प्रेरित करेल.​
प्रियंका बर्वे

गायिका प्रियंका बर्वेला राजकीय नेते अमर सिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली.
आर जे मलिष्का

Malishka RJ

‘गुड मॉर्निंग मुंबई’ हा आवाज रेडिओवरुन कानावर पडला की तो निश्चितच आरजे मलिष्काचा असणार हे कुणीही अचूक सांगेल. आपल्या आवाजाच्या सामर्थ्याने मलिष्का कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यामुळेच तिच्या या लोकप्रियतेचा ‘मोस्ट स्टायलिश आरजे’ हा पुरस्कार प्रदान गौरव करण्यात आला. मलिष्काला दुसरा पुरस्कार देण्यात आला. मोस्ट स्टायलिश जॉकी म्हणून मलिष्काने महेश मांजरेकरांच्या हस्ते अवॉर्ड स्वीकारला. ​शॉर्ट आणि चमचमणाऱ्या ड्रेसमध्ये ती कमालच दिसत होती.
गौतम सिंघानिया

Gautam

रेमंड समूहाचे एमडी आणि चेअरमन तसेच उद्योग विश्वातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे गौतम सिंघानिया. उद्योगविश्वात दिलेल्या योगदानासाठी गौतम सिंघानिया यांना या पुरस्कार सोहळ्यात ‘मोस्ट स्टायलिश इंडस्ट्रियालिस्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौतम सिंघानिया यांना हा पुरस्कार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी  ​बिट्टा सिंग उपस्थित होते.

सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल 

भारतीय उद्योग समूहातील एक आघाडीचे नाव म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल. स्टील, खाणकाम, वीज अशा विविध क्षेत्रात उद्योगाचा गाडा समर्थपणे चालवणारे उद्योगपती सज्जन जिंदाल यांची अनोखी स्टाइलही तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणत्याही पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात.

त्यानुसारच सज्जन यांच्या यशात त्यांची पत्नी संगीता जिंदाल यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच या जोडीला या पुरस्कार सोहळ्यात ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर कपल’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सज्जन आणि संगीता जिंदाल यांना प्रदान करण्यात आला.
अमृता फडणवीस

मोस्ट स्टायलिश पॉवर वुमन म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले. परंतु त्या विदेशात असल्यामुळे सोहळ्यात हजर राहु शकल्या नाही. त्यांच्यातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी हृतिक रोशन, राकेश रोशन, कौशिक मराठे स्टेजवर उपस्थित होते.
अतुल कसबेकर

आपल्या लेन्सच्या नजरेतून दिग्गजांच्या छबी कॅमेऱ्यात कैद करणारा प्रसिद्ध आणि स्टायलिश छायाचित्रकार म्हणजे अतुल कसबेकर. अतुलने आजवर अनेक बड्या स्टार्सना वेगळी ओळख देऊन नवा ट्रेंड सेट केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेतली गेली आहे. त्याला ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, जितेंद्र आणि नितीन सरदेसाई यांनी अतुलला हा पुरस्कार प्रदान केला.​
मिथिला पालकर

कप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. त्यामुळेच मिथिलाला या पुरस्कार सोहळ्यात ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रायसिंग युट्यूब स्टार’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिथिलाला हा पुरस्कार अरविंद सेतुरयाल विकी रतनानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उषा काकडे

बालकांचे आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण काम करणाऱ्या यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांचे स्टाइलविषयीचे कुतुहलही वाखण्याजोगे आहे. ‘यूएसके फाउंडेशन’च्या माध्यमातून उषा काकडे या विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘मोस्ट स्टायलिश सोशल आॅन्ट्रोप्रनर’ या अवॉर्डने गौरवण्यात आले. जितेंद्र  यांच्या हस्ते हा पुरस्कार काकडे यांना प्रदान करण्यात आला.
मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट म्हणून संजय सेठी यांचा लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, समुह संपादक दिनकर रायकर, करूण गेरा यांनी सन्मान केला. ''मोस्ट स्टायलिश सोशल इन्फ्लुएन्सर'' जय श्रॉफ यांना  हृतिकच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ​तर  प्रसिध्द ज्वेलर्स  मावजी पटेल यांना  सोनम कपूर आणि राकेश रोशन यांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

अतिशय थाटामाटात रंगलेल्या या शानदार सोहळ्यात स्टाइलचा एक अनोखा दैदिप्यमान सोहळा डोळे दिपवून टाकणारा ठरला.यावेळी त्यांच्या स्टाइलबरोबरच त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाथाही इतरांसाठी आदर्शवत ठरल्या.सर्व सत्कारार्थींनी लोकमत समूहाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :