LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : सोनम कपूर वडिलांनाच मानतेय ‘स्टाइल आयकॉन’

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जाणाºया अ‍ॅक्ट्रेसपैकी सोनम कपूर ही एक आहे. आपल्या स्टाइलविषयी नेहमीच कॉन्सिस असलेली सोनम मात्र याचे सर्व श्रेय तिच्या वडिलांना म्हणजेच अनिल कपूरला देतेय. वडिलांनाच ती ‘स्टाइल आयकॉन’ मानत असल्याचे तिने सांगितले.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : सोनम कपूर वडिलांनाच मानतेय ‘स्टाइल आयकॉन’
Published: 01 Feb 2017 03:26 PM  Updated: 01 Feb 2017 03:29 PM

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जाणाºया अ‍ॅक्ट्रेसपैकी सोनम कपूर ही एक आहे. आपल्या स्टाइलविषयी नेहमीच कॉन्सिस असलेली सोनम मात्र याचे सर्व श्रेय तिच्या वडिलांना म्हणजेच अनिल कपूरला देतेय. वडिलांनाच ती ‘स्टाइल आयकॉन’ मानत असल्याचे तिने सांगितले. 



लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात तिने याविषयीचा उलगडा केला. सोहळ्यात तिला ‘मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्ट्रेस’ या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्या हस्ते तिला अ‍ॅवॉर्ड देण्यात आला. याप्रसंगी आरजे मलिष्काने तिच्याशी संवाद साधला असता, तिने तिच्या स्टाइलविषयीच्या अनेक बाबींचा उलगडा केला. जेव्हा सोनमला तिचा पहिला क्र श कोण होता हे विचारण्यात आले तेव्हा तिने, ‘ओ ओ जाने जाना’ गाण्यावर नाचताना सलमानला पाहिल्यावर मी त्याच्या प्रेमात पडली होती, असे सांगितले. तसेच तिच्या मते इंडस्ट्रीमधील सर्वांत स्टायलिश अ‍ॅक्टर इम्रान खान, तर अ‍ॅक्ट्रेस कल्की कोचलिन आहे. 



खरं तर कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेसमध्ये दिसणाºया सोनमलाच स्टाइल आयकॉन म्हणून समजले जाते. तिच्यातील फॅन्शनचा सेन्स कायमच चर्चेत असतो. मात्र याचे सर्व श्रेय ती वडिलांना देत असल्याने तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सोहळ्यात जेव्हा तिला या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले तेव्हा ती भारावून गेली होती. हा अ‍ॅवॉर्ड माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही तिने आवर्जून सांगितले. 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :