LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : शाल्मली खोलगडे म्हणाली, मैैं परेशान... परेशान... परेशान

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिला ‘मोस्ट स्टायलिश सिंगर’ या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारल्यानंतर जेव्हा तिला परफॉर्म करायला सांगितले तेव्हा तिने ‘मैं परेशान... परेशान... परेशान’ हे गाणे गाऊन उपस्थितांची दाद मिळवली.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : शाल्मली खोलगडे म्हणाली, मैैं परेशान... परेशान... परेशान
Published: 01 Feb 2017 04:21 PM  Updated: 01 Feb 2017 04:21 PM

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिला ‘मोस्ट स्टायलिश सिंगर’ या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारल्यानंतर जेव्हा तिला परफॉर्म करायला सांगितले तेव्हा तिने ‘मैं परेशान... परेशान... परेशान’ हे गाणे गाऊन उपस्थितांची दाद मिळवली. 

या सोहळ्यात शाल्मलीचा अंदाज बघण्यासारखा होता. व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एंट्री करणारी शाल्मली तिच्या सुरेल आवाजासारखीच सुंदर दिसत होती. तिला संजय सेठी व लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जेव्हा शाल्मलीला परफॉर्म करायला सांगितले, तेव्हा ज्या गाण्याने तिला ओळख दिली तेच गीत गाणार असल्याचे म्हटले. 



इश्कजादे सिनेमातील ‘मैं परेशान... परेशान... परेशान... हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शाल्मलीच्या सुरेल आवाजामुळे सोहळ्याची सायंकाळ आणखीच प्रसन्न अन् सुरेल झाली. यावेळी शाल्मलीने लोकमतचे आभार मानले. रसिकांच्या मनात अढळस्थान निर्माण करणारी मराठमोळी गायिका शाल्मलीने पदार्पणातच सर्वोत्कृष्ट गायिका या कॅटेगिरीत फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळवला आहे. केवळ गायिकीच नव्हे तर आपल्या स्टाइलमुळेही ती सातत्याने चर्चेत असते. आपल्या सुरांनी रसिकांवर मोहिनी घालणाºया शाल्मलीचा स्टाइल अंदाज बघण्यासारखा असतो. 

स्टायलिश गायिका म्हणून तिने इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. आवाजाबरोबरच तिची स्टाइल फॉलो करणाºयांचीही संख्या कमी नाही. नेमका हाच धागा धरून ‘लोकमत’ने तिला मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डने गौरविले. शाल्मलीनेदेखील लोकमतचे आभार मानत, पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले. 

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :