रेडकार्पेटवर दिसला या अभिनेत्रींचा फॅशनचा जलवा

स्टाइल आयकॉन सोनम कपूरची हजेरी या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरली. नेहमी सोनम आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधूनया सोहळ्यात सोनम ट्रेडिशनल लूकमध्ये अवतरली होती. सिंपल अँड सोबर लूकमध्ये सोनम कपूरने उपस्थितांवर मोहिनी घातली.

रेडकार्पेटवर दिसला या अभिनेत्रींचा फॅशनचा जलवा
Published: 13 Nov 2017 01:43 PM  Updated: 13 Nov 2017 01:43 PM

दैनिक लोकमतने गेल्या वर्षीपासून  नव्या उपक्रमाला सुरुवात केली. मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.यंदाचे या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे.गेल्यावर्षी पार पडलेल्या सोहळ्यात रेड कार्पेटवर हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.ग्लॅमसर अभिनेत्रींच्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला चारचाँद लागल्याचे पाहायला मिळाले. नजर टाकूयात ब्युटी विथ ब्रेन असलेल्या स्टायलिश अभिनेत्रींवर.

स्टाइल आयकॉन सोनम कपूरची हजेरी या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरली. नेहमी सोनम आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधूनया सोहळ्यात सोनम ट्रेडिशनल लूकमध्ये अवतरली होती. सिंपल अँड सोबर लूकमध्ये सोनम कपूरने उपस्थितांवर मोहिनी घातली. 

सोनाली कुलकर्णीचा अंदाजही तितकाच घायाळ कऱणारा होता. काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये सोनालीचा स्टायलिश लूक उपस्थितांच्या नजरा आकर्षित करत होता. काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज असलेल्या या वेस्टर्न आऊटफीटमध्ये सोनालीनं या सोहळ्यात उपस्थिती लावली.

आपल्या स्टाईलने अमृताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अमृताची बोल्ड बिनधास्त स्टाइल प्रत्येकावर जादू करुन गेली.

‘इश्कजादे’ फेम शाल्मली खोडगडे या मराठामोळ्या गायिकाने आपल्या मधुर सूरांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. या सोहळ्यातही तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला. पांढ-या आणि सोनेरी स्ट्रीप्स असलेल्या वनपीसमध्ये शाल्मलीची उपस्थिती आकर्षक दिसत होती.त्यामुळे यंदाच्या या सोहळ्यात रेडकार्पेटवर कोणती अभिनेत्री आपल्या स्टायलिश लूकने सा-यांना घायाळ करणार याची सा-यांना उत्सुकता लागली आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :