LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : रेड कार्पेटवर सेलेब्सचा जलवा

​ग्लॅमर, राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्जांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात रेड कार्पेटवर सेलेब्सजचा जलवा बघावयास मिळाला.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : रेड कार्पेटवर सेलेब्सचा जलवा
Published: 01 Feb 2017 01:50 PM  Updated: 01 Feb 2017 01:55 PM

ग्लॅमर, राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्जांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात रेड कार्पेटवर सेलेब्सजचा जलवा बघावयास मिळाला. अतिशय आकर्षक अशा ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एंट्री करून या सेलिब्रेटींनी सोहळ्यात खºया अर्थाने रंगत आणली.  



बॉलिवूडसह, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची एंट्री सोहळ्यात चार चॉँद लावणारी ठरली. हृतिक रोशन, सोनम कपूर, टायगर श्रॉफ, ऋ षि कपूर, जितेंद्र, राकेश रोशन, गुलशन ग्रोव्हर, महेश कोठारे, आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, सई ताम्हनकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सोनाली बेंद्रे, राधिका आपटे, साजिद नाडियाडवाला, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर यांनी रेड कार्पेटवर एंट्री करताच एकच जल्लोष केला गेला. या सेलेब्सने परिधान केलेले ड्रेस विशेष चर्चेत राहिले. 



सोनम कपूर हिने आपल्या नेहमीच्याच अंदाजात हटके प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. अगदी कॅज्युअल ड्रेसमध्ये ती रेड कार्पेटवर अवतरली असली तरी, तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. हृतिक आणि टायगर हे मात्र बोल्ड अ‍ॅण्ड डॅशिंग अंदाजात बघावयास मिळाले. बॉलिवूडचा बॅडमॅन गुलशन ग्रोव्हर याने तर मिशांना पिळ देत रेड कार्पेटवरून एंट्री करून सर्वांच्याच नजरा स्वत:कडे वळविल्या. बॅड मॅनच्या या अदा टिपण्यासाठी कॅमेरामॅननी त्याच्याभोवती एकच गर्दी केली होती. 



अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आणि राधिका आपटे यांचा बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज रेड कार्पेटवर डोळे दीपवून टाकणारा ठरला. राधिकाने परिधान केलेला बॅकलेस ड्रेस विशेष चर्चेत राहिला. तिचा हा अंदाज उपस्थितांची दाद मिळवून गेला. सई आणि अमृतानेदेखील अतिशय हटके वेशभूषा साकारून सोहळ्यात रंगत आणली. 



महेश मांजरेकर यांचा लूक बघण्यासारखा होता. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर हॉलिवूडपटात काम करणार असल्याची चर्चा होती. अगदी त्याच अनुषंगाने त्याचा लूक वाटत होता. सेलिब्रेटींबरोबरच उद्योजक आणि राजकारण्यांनीही रेड कार्पेटवर आपली छाप पाडण्याची कुठलीच कसर सोडली नाही. 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :