LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : ...अन् राधिकाच्या ‘बम्बईरिया’ सिनेमाचे ट्रेलर झळकले

‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळा काही सेलिब्रिटींसाठी खूपच स्पेशल ठरला. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे हे होय. तिने तिच्या आगामी ‘बम्बईरिया’ या बहुचर्चित सिनेमाचे ट्रेलर सोहळ्यातच लॉँच करण्याची संधी साधली.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : ...अन् राधिकाच्या ‘बम्बईरिया’ सिनेमाचे ट्रेलर झळकले
Published: 02 Feb 2017 08:16 PM  Updated: 02 Feb 2017 08:16 PM

‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळा काही सेलिब्रिटींसाठी खूपच स्पेशल ठरला. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे हे होय. तिने तिच्या आगामी ‘बम्बईरिया’ या बहुचर्चित सिनेमाचे ट्रेलर सोहळ्यातच लॉँच करण्याची संधी साधली. 

राधिकाला सोहळ्यात ‘महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश क्रासओव्हर आयकॉन’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. राधिका यावेळी खुपच सुंदर दिसत होते. लाल रंगाच्या बॅकलेस गाऊनमध्ये तिचे सौदर्यं उठून दिसत होते. रेड कार्पेटवर राधिकाचा जलवा बघण्यासारखा होता. तिने जेव्हा सोहळ्यात हजेरी लावली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिवळल्या. अवॉर्ड घेण्यासाठी ती व्यासपीठावर गेल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या आगामी सिनेमाचीही चर्चा रंगली. 

राधिकाने देखील याच संधीचा फायदा घेऊन तिच्या ‘बम्बईरिया’ या सिनेमाचे ट्रेलर लॉँच केले. राधिका तिच्या स्टाइलसाठी ओळखले जाते. शिवाय तिच्या सिनेमाविषयीही प्रेक्षकांमध्ये नेमहीच उत्सुकता असते. बम्बईरिया या सिनेमाविषयीही तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमातील तिचा लुक हा अतिशय हटके असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राधिकाला या सोहळ्यात गौतम गाडगीळ आणि सौरव सिघांनिया यांच्या हस्ते, मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन हा अवॉर्ड देण्यात आला. राधिकाने याविषयी लोकमतचे आभार मानले.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :