LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : हृतिक रोशन अन् टायगर श्रॉफने धरला ठेका

‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड’ सोहळा सर्वच अर्थाने रंगतदार आणि अविस्मरणीय ठरला. जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफ आला ‘मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्टर’ या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे डान्सची झलक दाखविण्याची फरमाईश व्यक्त केली गेली.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : हृतिक रोशन अन् टायगर श्रॉफने धरला ठेका
Published: 01 Feb 2017 02:28 PM  Updated: 01 Feb 2017 02:28 PM

‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड’ सोहळा सर्वच अर्थाने रंगतदार आणि अविस्मरणीय ठरला. जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफ आला ‘मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्टर’ या अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे डान्सची झलक दाखविण्याची फरमाईश व्यक्त केली गेली. टायगरनेदेखील यास नकार न देता, डान्सची एक स्टेफ करून उपस्थितांची दाद मिळवली. मात्र त्याचदरम्यान ‘सेनो रिटा’ हे गाणे वाजविले गेल्याने टायगरने हृतिकला स्टेजवर बोलावून डान्स केला. मात्र त्यांचा हा डान्स उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. टायगर श्रॉफ याला जेव्हा अ‍ॅवॉर्डसाठी स्टेजवर बोलावले गेले, तेव्हा सूत्रसंचालक क्रांती रेडकर हिने त्याला डान्सविषयी आग्रह धरला. टायगरनेदेखील नकार न देता लगेचच डान्सची एक स्टेप करून दाखविली. मात्र त्याचदरम्यान हृतिक रोशन याचे ‘सेनो रिटा’ या गाणे वाजविले गेले. मग काय, टायमिंग अन् स्टेज दोन्ही उपलब्ध असल्याने हृतिकनेदेखील लगेचच स्टेजवर हजेरी लावून टायगरसोबत ठेका धरला. दोघांनी दोन-तीन डान्सच्या स्टेप करून उपस्थितांची दाद मिळवली. जेव्हा हृतिक डान्ससाठी स्टेजवर गेला, तेव्हा एकच जल्लोष झाला. शिवाय हृतिक स्टेजवर आल्याने टायगरचादेखील उत्साह वाढला. दोघांनीही जबरदस्त डान्सच्या स्टेप करून सोहळ्यात रंगत आणली. त्याचबरोबर टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच स्टेज शेअर करताना दिसल्याने, त्यांची झलक मोबाइलमध्ये टिपण्यासाठी अनेक हात पुढे आले. हृतिक आणि टायगर दोघेही जबरदस्त डान्ससाठी ओळखले जातात. आपल्या लवचीक शरीराद्वारे ते अशक्य स्टेप सहज करून दाखवितात. त्याचाच नमुना याठिकाणी बघावयास मिळाला. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :