Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017:‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ आज रंगणार गौरव सोहळा

या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिस्ट पर्सनालिटीलाच या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे.

Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017:‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ आज रंगणार गौरव सोहळा
Published: 14 Nov 2017 04:51 PM  Updated: 14 Nov 2017 04:51 PM


‘स्टाइल में रहनेका’ हे चित्रपटातून वारंवार समाजमनावर बिंबवले जाते.कारण स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू असून इतरांना आकर्षित करण्यासाठी स्टाइल प्रभावी ठरते.अशाच महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमत गौरव करित आहे.या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पुष्प असून महाराष्ट्राचा मोस्ट स्टायलिश कोण हे आज ठरणार आहे.साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. आज हा सोहळा ताज लँड हाटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात रंगणार आहे.सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर सामाजिक,राजकिय,आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत.लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसंच झूम,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.
 
या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिस्ट पर्सनालिटीलाच या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. 
 
या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे. बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री आणि तरुणाईची फेव्हरेट जोडी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक -निर्माता करण जोहर, रोहित शेट्टी, अभिनेत्री काजोल, कॉमेडीयन कपिल शर्मा, मनीष पॉल, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, अंकुश चौधरी, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, आदिनाथ कोठारे, क्रांती रेडकर, मयूरी देशमुख, ह्रता दुरगुळे, सावनी रविंद्र, मंगेश बोरगावकर, किर्ती किल्लेदार यांच्यासह दिग्गजांची उपस्थित राहणार आहे. 
 
हा केवळ स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा गौरव सोहळाच नाही तर सेलिब्रिटी मंडळींची अनेक गुपिते या अनोख्या पुरस्कार सोहळ्यामुळे समोर येणार आहेत.त्यामुळे आगळ्यावेगळ्या ठरणा-या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता लागली आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :