या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला,ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना 'लोकमत स्टाइल अवॉर्ड'मध्ये एकत्र दिसले आलिया -सिद्धार्थ!

आता या दोघांमध्ये काय सुरू आहे या विषयी उघडपणे सगळ्या गोष्टी बाहेर येत नसल्या तरीही ज्या ज्या इव्हेटंला हे दोघे हजेरी लावतात त्यावेळी दोघांची उपस्थितीने पुन्हा एकदा हे लव्हबर्ड चर्चेत नाही आले तरच नवल.

या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला,ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना 'लोकमत स्टाइल अवॉर्ड'मध्ये एकत्र दिसले आलिया -सिद्धार्थ!
Published: 16 Nov 2017 03:39 PM  Updated: 16 Nov 2017 04:49 PM


साई रिअल इस्टेट प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्याला बॉलिवुड, मराठी सिनेसृष्टी, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्यात रेड कार्पेटवर विविध सेलिब्रिटी आणि मान्यवरांच्या स्टाइलचा जलवा पाहायला मिळाला. मनमोहक आणि तितक्याच ग्लॅमरस स्टाइलचे ड्रेस परिधान करत रेड कार्पेटवर एंट्री केलेल्या या सेलिब्रिटींनी या सोहळ्याला चारचाँद लावले. या सोहळ्यातील प्रत्येकाची स्टाइल अन् अदा घायाळ करणारी अशीच होती. या सोहळ्यात सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या त्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी. गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काही तरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. स्टुडन्ट ऑफ द इयर सिनेमातून आलिया आणि सिद्धार्थ यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. पहिल्या सिनेमापासूनच दोघांत वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. तेव्हापासूनच आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र गेल्या काही दिवसांत या लव्ह बर्ड्समध्ये दुरावा आल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु होत्या. दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जात होतं. दोघेही फार एकत्र पाहायला मिळाले नाहीत. मात्र लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात आलिया आणि सिद्धार्थ एकत्र आले. यावेळी रेड कार्पेटवर दोघांच्या स्टाइलचा जलवा तर दिसलाच, शिवाय दोघांनी एकत्र कॅमे-यांसमोर पोझही दिल्या. या सगळ्या फोटोसेशनमधून या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला असून ब्रेकअपच्या चर्चा केवळ अफवाच असल्याचं सांगण्याचा जणू त्यांनी प्रयत्न केला. 

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लिंकअपबद्दल केवळ चर्चा सुरु आहे. खुद्द आलिया आणि सिद्धार्थ याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. पण शेवटी प्रेम लपल्याने लपणार थोडेच.अलीकडे आलिया व सिद्धार्थ यांच्या ब्रेकअपच्या वावड्याही उठल्या.आता या दोघांमध्ये काय सुरू आहे या विषयी उघडपणे सगळ्या गोष्टी बाहेर येत नसल्या तरीही ज्या ज्या इव्हेटंला हे दोघे हजेरी लावतात त्यावेळी दोघांची उपस्थितीने पुन्हा एकदा हे लव्हबर्ड चर्चेत नाही आले तरच नवल.  


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :