रंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण!

अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात स्टाइलचा एक अनोखा देदीप्यमान सोहळा डोळे दिपवून टाकणारा ठरला. यावेळी त्यांच्या स्टाइलबरोबरच त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाथाही इतरांसाठी आदर्शवत ठरल्या. सर्व सत्कारार्थींनी लोकमत समूहाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

रंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण!
Published: 16 Nov 2017 04:23 PM  Updated: 16 Nov 2017 04:23 PM


महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डच्या दैदीप्यमान सोहळ्याची शान मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साक्षीने कमालीची खुलली. चंदेरी दुनियेप्रमाणेच उद्योग जगतातील मातब्बर विजेत्यांच्या सळसळत्या अभूतपूर्व प्रतिसादाने स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्याची रंगत रात्रीच्या बरोबरीने कमालीची चढत गेली. स्टाइल ही निव्वळ फॅशन नव्हे तर ते एक भारदस्त स्टेटमेंट असल्याची अनुभूती देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला. सोहळ्यातील अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा धांडोळा.

ग्लॅमर, उद्योग आणि फॅशन जगतात वावरत असताना तुमची स्टाइल हेच तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. महाराष्ट्रातील अशाच स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी दिमाखात पार पडलेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या स्टाइलचाच नव्हे तर त्यांच्या यशाचाही गौरव करण्यात आला. 

साई रिअल इस्टेट प्रस्तुत सोहळ्याचे प्रोगे्रस पार्टनर कार्लटन,स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम, पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर होते. या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतातील कलाकारांचा स्टायलिश अवॉर्डने गौरव करण्यात आला. फॅशन तथा उद्योगजगतातील स्टायलिश मान्यवरांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अभिनेत्री आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, काजोल, अनन्या बिर्ला, सई ताम्हणकर, करण जोहर, रोहित शेट्टी, जॅकी श्रॉफ आशुतोष गोवारीकर यांच्यासह हिंदी व मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी तसेच लोकमतचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर-इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा,सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा आदी उपस्थित होते.

या रंगतदार सोहळ्याच्या सायंकाळी सेलिब्रिटींनी हजेरी लावत सोहळ्यात रंग भरला. प्रत्येक सेलिब्रिटीच्या स्टाइलचा अंदाज बघण्यासारखा होता. मनोरंजनच नव्हे, तर राजकीय तथा उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचीही स्टाइल बघण्यासारखी होती. रेड कार्पेटवर एंट्री केल्यानंतर प्रत्येक मान्यवराने त्यांच्या स्टाइलचे सिक्रेट सांगितले. पुरस्कार सोहळ्यातही अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

‘आई तनुजाच आपली स्टाइल आयकॉन’, असे सांगताना अभिनेत्री काजोल भावुक झाली. जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने लेखक चेतन भगत यांच्याकडून मोस्ट स्टायलिश  नेक्सट जेन रायजिंग सुपरस्टार हा अवॉर्ड स्वीकारताना राधा तेरी चुनरी या गाण्यावर ठेकाही धरला. अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नेहमीच्या शैलीत त्यांच्या स्टाइलचे गुपित उघड केले. ‘वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाइल शिकलो, असे जॅकी श्रॉफ म्हणाले. माझ्या लिखाणातच माझी स्टाइल पाहावी, असे चेतन भगत यांनी सांगितले. 

अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात स्टाइलचा एक अनोखा देदीप्यमान सोहळा डोळे दिपवून टाकणारा ठरला. यावेळी त्यांच्या स्टाइलबरोबरच त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाथाही इतरांसाठी आदर्शवत ठरल्या. सर्व सत्कारार्थींनी लोकमत समूहाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :