LIVE UPDATE : Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव!

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणाºया महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश सोहळ्यास अतिशय दिमाखदारपणे सुरुवात झाली आहे. रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळत असून, त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले आहेत.

LIVE UPDATE : Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव!
Published: 14 Nov 2017 08:42 PM  Updated: 14 Nov 2017 11:29 PM

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणाºया महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश सोहळ्यास अतिशय दिमाखदारपणे सुरुवात झाली आहे. रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळत असून, त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले आहेत. ताज लॅण्ड हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीसह राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सध्या या सोहळ्यास प्रारंभ झाला असून, सेलिब्रिटी त्यांच्या हटके अंदाजाने सोहळ्यास रंगत आणत आहेत. रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखविताना सेलिब्रिटींचे आगमन होत आहे. या सोहळ्यात मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा गौरव केला जाणार असल्याने सोहळ्याला एक विशेष महत्त्व आहे.  

ट्रॉफीही स्टायलिश
महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरु ष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्यरु पी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.मराठमोळ्या मनांवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता पुष्कर सुधाकर श्रोत्री आणि सर्वांचा लाडका अभिनेता प्रसाद ओक यांनी अशी एकत्र एन्ट्री घेतली.बाबा सिद्दीकी यांनी अशी स्टायलिश हजेरी लावली.स्टनिंग प्रीति झिंगानी आणि प्रवीण डबास यांनी लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अर्वाड्सला हजेरी लावली.मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एमडी डॉ. अश्विनी भिडे यांनी महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर अशी पोज दिली. ग्लॅमरस सई ताम्हणकर हिची सोहळ्यात एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आलेल्या सईने सोहळ्याला जणू चारचाँद लावले. यावेळी मराठी इंडस्ट्री स्टायलिस्ट झाली आहे, त्याचा सन्मान होतो हे महत्त्वाचं. लोकमतच्या या पुरस्काराला यायला मिळणं भाग्य आहे , अशी प्रतिक्रि या अभिनेता भूषण प्रधानने दिली आहे. तर अभिनेत्री सई ताम्हणकरने आनंद वाटतो हे प्लॅटफॉर्म तयार केलं. लोकमतच्या या कामाचं कौतुक आहे असं सांगितलं आहे. राज्याच्या ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनीही या खास सोहळ्यास अशा अंदाजात उपस्थिती लावली.बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी अशा ‘ब्लॅक’ स्टाईलमध्ये रेड कार्पेटवर आला.निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्यासोबत अशा स्टायलिश अंदाजात पोझ दिली. या दोघांच्या आगमनाने सोहळ्यात एक वेगळीच रंगत आली.अभिनेत्री मयुरी देशमुख हिने अतिशय स्टनिंग अंदाजात रेड कार्पेटवर एंट्री केली. तिचा स्टायलिश अंदाज घायाळ करणारा होता.
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :