Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: काजोलची विंटर सीझन ड्रेसिंग स्टाइल

साई रिअल इस्टेट प्रस्तुत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.

Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: काजोलची विंटर सीझन ड्रेसिंग स्टाइल
Published: 16 Nov 2017 04:51 PM  Updated: 16 Nov 2017 04:51 PM

साई रिअल इस्टेट प्रस्तुत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते. या सोहळ्यात सगळ्यांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली ती काजोलची स्टाइल. काजोलने सारीवर गोल्डन रंगाचे जॅकेट परिधान करत उपस्थितांचे लक्ष वेधले होते.  काजोलच्या ड्रेसकडे बघून तिची ही स्टाइल विंटर परफेक्ट असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काजोलने तिच्या नृत्याने, तिच्या अभिनयांने आणि तिच्या अदांनी तर सर्वानांच घायाळ केले आहे. 


आता अॅवॉर्ड फंक्शन म्हटले की सेलिब्रेटी, वेस्टर्न आऊटफिट, इंडो-वेस्टर्न आऊटफिट, ट्रे़डिशनल गाऊनमध्ये हजेरी लावताना दिसतात. मात्र या व्याख्येला तडा देत काजोलने एक वेगळीच स्टाइलस्टेमेंट सेट केली. सध्या लगीन सराई आणि विंटर सीजन दोन्ही ही सुरु झाले आहेत त्यामुळे अनेकांना काजोलची स्टाइल कॉपी करता येई शकते. काजोलने  डस्टी ऑरेंज सारीवर काजोलने गोल्डन रंगाचा जॅकेट परिधान केला होता.   या सोहळ्यात काजोलने महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार पटकावला. ग्लॅमर आयकॉनच्या पुरस्काराची खऱ्या अर्थाने काजोलची मानकरी असल्याचे तिच्या ड्रेसिंग स्टाइलवरून तिने दाखवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यानंतर तिच्याशी रंगल्या त्या दिलखुलास गप्पा. माझी आई तनुजा हिच माझी स्टाईल आयकॉन आहे, असे तिने सांगितले. आईबद्दल बोलताना काजोल काहीशी हळवी झालेली ही दिसली.  

आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यावेळी हजारो मुले माझ्या आईला आई म्हणत होती. जे मला आवडायचे नाही. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत, अशी प्रामाणिक कबुली काजोलने यावेळी दिली. आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती, तिची तीच स्टाईल माझी आवडती आहे, असे काजोलने सांगितले. माझ्यासाठी स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. कारण प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते, असेही तिने सांगितले.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :