Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : केवळ बातम्या देणे हे लोकमतचे काम नाही. - विजय दर्डा

महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतकडून गौरव करण्यात येत आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी या सोहळ्याला संबोधित केले.

Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : केवळ बातम्या देणे हे लोकमतचे काम नाही. - विजय दर्डा
Published: 14 Nov 2017 10:13 PM  Updated: 14 Nov 2017 10:49 PM

महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतकडून गौरव करण्यात येत आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी या सोहळ्याला संबोधित केले. वृत्तपत्रं म्हटलं की, बातम्या देणे, इतकाच दृष्टिकोन बाळगला जातो. पण केवळ बातम्या देणे हेच लोकमतचे काम नाही. तर यापलीकडे जात लोकमतने विविध सामाजिक मुद्यांना, सामाजिक अंगांना स्पर्श केला आहे. महाराष्ट्रातील स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव हाही अशाच एका आगळ्या-वेगळ्या प्रयत्नांचा भाग आहे, असे ते म्हणाले.  यावेळी त्यांनी बालदिनानिमित्त आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मुलेच आपल्याला रस्ता दाखवतात, आपण कसे जगाव हे मुलचं शिकवतात, जीवन जगण्याची कला आपल्याला लहान मुलाकडून मिळते, असे ते म्हणाले. 

लोकमत महाराष्ट्राज् स्टायलिश अवार्ड्स या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :