रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींचा फॅशनचा जलवा

आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे.कारण मोस्ट स्टायलिश पर्सनालिटीजना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. अमृता फडणवीस, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींचा फॅशनचा जलवा
Published: 30 Jan 2017 10:22 AM  Updated: 30 Jan 2017 10:22 AM

कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत.मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार,फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे.कारण मोस्ट स्टायलिश पर्सनालिटीजना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे.
 
या पुरस्कार सोहळ्याला हँडसम हंक हृतिक रोशन हजेरी लावणार आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी नवीन लूकमध्ये तो पाहायला मिळेल. यावेळी तो स्पोर्टी नाही तर डॅशिंग लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ब्लेझरलूकमध्ये हृतिक या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सोनम कपूरने डेनिम साडी परिधान करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ती अशाच हटक्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.यावेळी ती डिसेंट लूक असलेला वनपीस परिधान करुन सगळ्यांना आपल्या अंदाजाने घायाळ करणार आहे. मराठमोळी मुलगी अभिनेत्री सई ताम्हणकरही या सोहळ्यावेळी हजेरी लावणार आहे. त्यामुळे या सोहळ्यावेळी तिची स्टाइल कशी असणार याचीही सा-यांनाच उत्सुकता लागली आहे. तर यासाठी तिने विशेष तयारी केली आहे. यावेळी ती आपल्याला इंडोवेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहायला मिळणार आहे.

तर अशाप्रकारे हटके स्टाइल करत इतर सेलिब्रेटीसुद्धा आपल्या स्टाइलिश लूकने या सोहळ्याला चारचाँद लावणार आहेत.वेस्टर्न आऊफिटमध्ये राधिका आप्टे स्वतःला प्रेझेट करताना दिसेल.याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होममिनिस्टर म्हणजेच अमृता फडणवीस, युथ आयकॉन असलेले शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :