कोणत्या अभिनेत्रीचा जीन्स टाॅपध्येही दिसतो क्लासी लूक?

या बॉलिवूड अभिनेत्री जितक्या त्या एका वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमसर दिसतात तितका त्यांचा जीन्स आणि टॉपमध्ये घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतो.

कोणत्या अभिनेत्रीचा जीन्स टाॅपध्येही दिसतो क्लासी लूक?
Published: 27 Jan 2017 03:18 PM  Updated: 27 Jan 2017 04:12 PM

एरव्ही बॉलिवूडच्या अभिनेत्री बोल्ड आणि ब्युटीफुल ड्रेस परिधान करत रसिकांना घायाळ करत असतात. मात्र फक्त मेकअप आणि ड्रेसमध्येच या अभिनेत्री सुंदर दिसतात असे नसून जेव्हा या अभिनेत्री जीन्स टॉप घालत स्पोर्टी लूकमध्ये दिसतात तेव्हाही त्या तितक्याच ग्लॅमसर आणि स्टाइलिश दिसतात. सध्याच्या आघाडीच्या नायिका या स्टाइलवरही खूप फोकस करताना दिसतात. पिग्गी चॉप प्रियंका चोप्रा असो किंवा मग दीपिका पादुकोण. अनुष्का शर्मा असो किंवा मग आलिया भट्ट या अभिनेत्री जीन्स टॉपमध्येही तितक्याच स्टाइलिश आणि अट्रॅक्टीव्ह दिसतात. जितक्या त्या एका वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमसर दिसतात तितका त्यांचा जीन्स आणि टॉपमध्ये घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतो. 



काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण एअरपोर्टवर दिसली.त्यावेळी तिचा  अगदी डिसेंट लूक पाहायला मिळाला. सिंपल एंड सोबर अशा काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स तिने परिधान केली होती, डोळ्यावर गॉगल हातात तर जॅकेट आणि पायात स्निकर घालत ती आणखी सुंदर दिसत होती. 




तर दुसरीकडे चार्मिंग आलिया भट्टही जितकी तिच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते तितकीच ती आता तिच्या स्टाइलमुळेही रसिकांना जास्त आवडू लागली आहे. ट्रेडिशनल असो किंवा मग वेस्टर्न आऊटफिट सगळ्या प्रकारच्या आऊटफिटमध्ये आलिया तितकीच क्युट दिसते. एका कार्यक्रमात जास्त अॅक्सेसरीज न घालता फक्त कलरफुल टॉप आणि जीन्समध्ये स्पोर्टी लूक मध्ये दिसली.अतिशय साध्या पण तितकाच कंम्फर्ट असणा-या गेटअपमध्ये आलिया खूप चार्मिंग दिसत होती.




अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीमुळे खूप चर्चेत असते.मात्र जेव्हा अनुष्काने 'रब ने बना दी जोडी'सिनेमात पदार्पण केले. तेव्हा ती सोबर अंदाजात दिसली. आज  सुल्तान गर्ल बनलेल्या अनुष्काचा अंदाजही दिवसेंदिवस अट्रॅक्टिव्ह वाटतोय. एका कार्यक्रमात सिंपल पांढ-या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये ती भाव खावून जात होती. विशेष म्हणजे टॉपला मॅचींग असणारे स्निकरही(फुटवेअर) तिने घातले होते.त्यामुळे तिची पर्सनालिटीही स्टाइलिश वाटत होती. सोबर स्टाइल लूकमध्ये तिने लाईट गुलाबी रंगाची लिपस्टीक लावत  स्वतः डिसेट लूकमध्ये प्रेझेंट करताना दिसली. 



या सगळ्या अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. एका एव्हेंटमध्ये निळ्या रंगाचा जॅकेट, पांढ-या रंगाचा टॉप हिल असणारे काळ्या रंगाचे शूजमध्ये तिचा क्लासी लूक पाहायला मिळाला.या सगळ्या अभिनेत्रींच्या अभिनयाप्रमाणेच ''स्टाइल में रेहने का' म्हणत चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्यास भाग पाडतात. 





 

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :