चेतन भगतसोबत सेक्सी राधा गाण्यावर ठुमके लावत आलिया भट्टने सांगितले तिच्या स्टाइलचे सीक्रेट!

​जेव्हा आपण एखाद्याच्या स्टाइलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे कौतुक करतो असे म्हणत आलिया भट्टने तिच्या स्टाइलचे सीक्रेट सांगितले.

चेतन भगतसोबत सेक्सी राधा गाण्यावर ठुमके लावत आलिया भट्टने सांगितले तिच्या स्टाइलचे सीक्रेट!
Published: 14 Nov 2017 11:19 PM  Updated: 14 Nov 2017 11:44 PM

जेव्हा आपण एखाद्याच्या स्टाइलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे कौतुक करतो असे म्हणत आलिया भट्टने तिच्या स्टाइलचे सीक्रेट सांगितले. लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०१७ सोहळ्यासाठी आलिया खास उपस्थित होते. यावेळी आलियाला लेखक चेतन भगत यांच्या हस्ते ‘मोस्ट स्टायलिश रायजिंग स्टार’ हा पुरस्कार देण्यात आला. आलियाचे सोहळ्याच्या स्थळी एंट्री मारताच सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिवळल्या. अतिशय स्टायलिश अंदाजात असलेल्या आलियाने मराठीत संवाद साधून उपस्थितांचे मने जिंकलीत. यावेळी आलियाने लेखक चेतन भगत यांच्यासोबत सेक्सी राधा या गाण्यावर डान्सही केला. आलियाचा हा चुलबुला अंदाज उपस्थितांना चांगलाच भावला. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०१७ पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु  आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

ग्लॅमरस जगातातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यात उपस्थिती लावली असून, सोहळा उत्तरोत्तर रंगत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री काजोल हिने देखील तिच्या स्टाइलचे सीक्रेट सांगताना सर्व श्रेय आई तनुजाला दिले आहे. आईच माझी खरी स्टाइल आयकॉन असल्याचे काजोलने सांगितले. यावेळी काही आठवणी सांगताना ती भावूक झाल्याचेही दिसून आले. काजोलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन’ हा पुरस्कार देण्यात आला. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :