अमिताभ बच्चन आहेत स्टाइल आयकॉन -चिन्मय मांडलेकर

90च्या दशकात जॅकी श्रॉफ यांची प्रचंड क्रेझ होती.

अमिताभ बच्चन आहेत स्टाइल आयकॉन -चिन्मय मांडलेकर
Published: 09 Jan 2017 11:07 PM  Updated: 14 Jan 2017 02:24 PM

जी तुमची असते, स्वतःची असते ती स्टाइल असते. तुम्ही जे फॉलो करता ती फॅशन असते. माझ्यासाठी स्टाइल हे चांगले कपडे, एक्सेसरीज, शूज नसून तुमचा एटीट्युड तुमची स्टाइल असते.मला फारसे कपड्यांमध्ये, एक्सेसरीजमधलं कळत नाही. असं म्हणतात जे कुंभ राशीचे असतात त्यांची स्टाइल खूप विचित्र असते आणि माझी रास ही कुंभ आहे. माझी पत्नी मला स्टायलिश बनवण्यासाठी खूप मेहनत घेते. तिच सगळ्या गोष्टींची निवड करत माझ्या स्टाइलमध्ये त्या गोष्टी अॅड करत असते. मला अपडेट आणि अपग्रेटेड ठेवण्याचे काम माझी पत्नी करते. माझ्यासाठी कम्फर्ट महत्त्वाचा आहे.  मला फार फ्लॅशी क्लोथ आवडत नाहीत. त्यामुळे नेहमी मी टीशर्ट, जीन्स आणि हातात एक घड्याळ कॅरी करतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी ज्यांना बघत लहानाचा मोठा झालो ते म्हणजे जॅकी दादा.

आमच्या तरूणपणी 90च्या दशकात जॅकी श्रॉफ यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांची स्टाइल बरेचजण कॉपी करताना दिसायचे. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन हे माझे खूप फेव्हरेट आहे कारण त्यांची प्रत्येक गोष्ट स्टाइल बनते त्यामुळे कधीही अमिताभ बच्चन माझ्यासाठी मोस्ट स्टायलिश पर्सनालिटी असतील. नवीन जनरेशनमध्ये सिनेइंडस्ट्री सोडली तर क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीची स्टाइल मला भावते तर दुसरीकडे मराठी इंडस्ट्रीत उमेश कामतची ड्रेसिंग स्टाइलचे मला नेहमी अप्रुप वाटते. त्याची कपड्यांची स्टाइल खूप मस्त असते. तसेच स्वप्निल जोशीचीही हटके स्टाइल असते त्याचंही मला नेहमी कौतुक वाटते. इतकेच नाही तर मला राजकारण्यांमध्ये राज ठाकरे खूप स्टायलिश वाटतात. त्यांची स्टाइलही त्यांच्या पर्सनालिटीशी खूप मॅच होते. त्यामुळे राज ठाकरे यांची एक युनिक स्टाइल असल्यामुळे आवडते. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :