सई ताम्हणकरला जायचंय क्रिकेटर अजिंक्य रहाणेसोबत डेटवर

महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाखती दरम्यान या दोन्ही अभिनेत्रींना बोलते केले. विशेष म्हणजे सई ताम्हणकरला अजिंक्य रहाणेसोबत डेटवर जायला आवडेल तर अमृता खानविलकरलाही रणवीरसिंगसह डेटवर जायला आवडेल असल्याचे या दोघींनीही या मुलाखतीतत सांगितले.

सई ताम्हणकरला जायचंय क्रिकेटर अजिंक्य रहाणेसोबत डेटवर
Published: 01 Feb 2017 03:36 PM  Updated: 01 Mar 2017 04:43 PM

सेलिब्रिटींचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची रसिकांना इच्छा असते. त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक बाबींची माहिती रसिकांना हवी असते. हे सारं अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली ती मुंबईतील कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्यात. प्रोगेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, RED FM रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर असलेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, फॅशन तसंच उद्योग जगतामधील स्टायलिश मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यात उपस्थितांना कलाकारांचे स्टाइल फंडे जाणून घेता आलेच. इतकंच नाही यावेळी सेलिब्रिटींनी त्यांच्या मनातली गुपितंही उघड झाली. 

या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित रसिकांना अनोखं सरप्राईज मिळालं. लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डसवेळी अमृता खानविलकरला‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर अमृतासह, सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं. यानंतर महेश मांजरेकर यांनी अमृता आणि सईशी दिलखुलास गप्पा मारल्या. महेश मांजरेकर यांनी एकाहून एक भन्नाट प्रश्न विचारत सई आणि अमृताच्या मनातील गुपितं जगासमोर आणली. सोनम कपूर ही फॅशन आयकॉन असल्याचे यावेळी सईने सांगितले. तसंच अमृताची स्टाईलही तिला भावते. लयभारी स्टार रितेश देशमुख हा सईचा फेव्हरेट स्टायलिश अभिनेता आहे. शिवाय अंकुश चौधरीचीही स्टाईलसुद्धा तिला तितकीच खास वाटते.मराठीतला कोणता अभिनेता हिंदी सिनेमात चांगले करियर घडवू शकतो असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी यावेळी दोघींना विचारला. त्यावेळी अमेय वाघ, वैभव तत्त्ववादी आणि सुबोध भावे हे मराठीतले स्टार्स हिंदीतही तितकेच चमकू शकतात असे दोन्ही सौंदर्यवतींना वाटते.  
साधे सरळ सोपे प्रश्न झाल्यानंतर वेळ होती ती थोडं गॉसिप, थोडं मसालेदार गोष्टी जाणून घेण्याची. त्यामुळेच महेश मांजरेकर यांनी गुगली टाकून गॉसिप होस्टची भूमिका निभावली. हेल्दी डेटसाठी कुणासोबत जायला आवडेल असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी सईला विचारला. त्यावेळी टीम इंडियाचा स्टार बॅट्समन अजिंक्य रहाणेसोबत डेटवर जाण्याची इच्छा सईने व्यक्त केली. तर याच प्रश्नावर अमृताने क्षणाचाही विलंब न लावता रणवीर सिंह हे उत्तर दिलं. रणवीरची फॅन असल्याने त्याच्यासोबत कधीही डेटवर जायला तयार असल्याची कबूली अमृताने दिली. माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :