येरे येरे पैसा म्हणजे पैसे वसुलीचा टाईमपास मामला

येरे येरे पैसा म्हणजे पैसे वसुलीचा टाईमपास मामला विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, तुषार दळवी, किशोर प्रधान
  • निर्माता - झी स्टुडिओ, अमेय खोपकर दिग्दर्शक - संजय जाधव
  • Duration - दोन तास Genre - कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

येरे येरे पैसा म्हणजे पैसे वसुलीचा टाईमपास मामला

राज चिंचणकर 

संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, तुषार दळवी, किशोर प्रधान अशी तगडी 'स्टारकास्ट' चित्रपटात असल्यावर त्याने विशिष्ट उंची गाठणे अपेक्षित आहे. 'येरे येरे पैसा' या चित्रपटाने तसा प्रयत्न नक्कीच केला आहे. मात्र या सगळ्याला अतिरंजितपणाचा तडका दिल्याने ही भट्टी 'लाऊड' झाली आहे. तरीही या कथेतला पैसे वसुलीचा हा एकूणच मामला 'निव्वळ टाईमपास' या व्याख्येत मात्र बसणारा आहे. 

एकाच चाळीत सनी आणि बबली राहतात. सनीचे बबलीवर प्रेम असते. चित्रपटाची तिकिटे 'ब्लॅक' करण्याचा सनीचा उद्योग असतो; तर चित्रपटाची 'हिरॉईन' होण्याचे स्वप्न बबली बघत असते. तर दुसरीकडे असे काही योग जुळून येतात की सोशल मिडियासाठी 'प्रॅन्क' करणारा आदित्य व कोट्यवधींची पैसेवसुली करणारा एजंट अण्णा यांची गाठ पडते. दहा कोटींची वसुलीची रक्कम घेऊन जात असलेल्या अण्णाला रस्त्यात आदित्य भेटतो आणि त्यावेळी अण्णाचे पैसे घेऊन भलताच कुणीतरी गायब होतो. परिणामी, अण्णा आदित्यच्या जीवावर उठतो. सनी आणि बबली सुद्धा यात गुरफटले जातात. यानंतर पैसेवसुली, हिऱ्यांची अदलाबदल यासारखा थोडाफार परिचित वाटणारा असा जो काही सावळागोंधळ उडतो, तो या चित्रपटात पाहायला मिळतो.   

या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे, पटकथा त्यांच्यासह अरविंद जगताप यांची आणि संवादलेखन अरविंद जगताप यांचे आहे. हा चित्रपट पाहताना डोके बाजूला काढून ठेवत त्यात रममाण व्हावे, ही अट त्यांनी मुदलातच ठेवली आहे. त्यामुळे 'क'च्या बाराखडीतले प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच निकालात निघतो. किंबहुना असे प्रश्न पडताच कामा नयेत, हे गळी उतरवण्याचे काम या मंडळींनी प्रामाणिकपणे केले आहे. मग त्या दृष्टीने जी काही धमाल-मस्ती करता येईल, ती सढळ हाताने त्यांनी चित्रपटात केली आहे. पण हे सर्व मांडताना, काही प्रसंगांत अतिरंजितपणाची पेरणी केल्याने त्यातली रंजकता 'काहीही' या पठडीत जाऊन पोहोचते. समज-गैरसमजाचा हा पट अर्कचित्रात्मकतेच्या दृष्टीने सादर करण्याचा प्रयत्न केला गेला असला, तरी त्यातला भडकपणा जरा जास्त झाला आहे. कथेचा वेग मात्र चांगला राखला आहे, त्यामुळे चित्रपट रेंगाळत नाही. चित्रपटातली गाणीही त्याच्या जातकुळीला फिट्ट बसणारी आहेत. 

सिद्धार्थ जाधव (सनी), तेजस्विनी पंडित (बबली), संजय नार्वेकर (अण्णा), उमेश कामत (आदित्य) या चौघांनी हा सावळागोंधळ योग्य तो धिंगाणा घालत व्यवस्थित 'कॅरी' केला आहे. मृणाल कुलकर्णी यांना थोड्या वेगळ्या प्रकारची भूमिका यात साकारायला मिळाली आहे. आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, तुषार दळवी, किशोर प्रधान, बिजॉय आनंद छोट्या भूमिकांमध्येही लक्षात राहतात. थोडक्यात, डोक्याला त्रास होऊ न देण्यासाठी खबरदारी घेण्याची तयारी आणि निव्वळ करमणूक हवी असेल, तर या पैशाला 'येरे येरे' करता येईल. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

बिग बॉसचा यंदाचा सिझन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :