rakshas marathi movie review : न घाबरवणारा राक्षस

rakshas marathi movie review : न घाबरवणारा राक्षस विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - शरद केळकर, सई ताम्हणकर, ऋतुजा देशपांडे
  • निर्माता - विवेक कजारिया, निलेश नवलखा दिग्दर्शक - ज्ञानेश झोटिंग
  • Duration - २ तास २० मिनिटे Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

rakshas marathi movie review : न घाबरवणारा राक्षस

प्राजक्ता चिटणीस

जितेंद्रचा हातिम ताई हा चित्रपट नव्वदीच्या दशकात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हातिम काही कोडी सोडवतो आणि परीचा जीव वाचवतो. त्याचप्रमाणे राक्षस या चित्रपटात एक लहान मुलगी आपल्या वडिलांना शोधण्यासाठी काही कोडी सोडवते. ही कोडी सोडवल्यानंतर खरा राक्षस कोण आहे हे या मुलीला कळणार असे तिला सांगितलेले असते. त्यामुळे हा चित्रपट पाहाताना आपल्याला हातिम ताईची आठवण नक्कीच येते. 
अविनाश (शरद केळकर) आदिवासी लोकांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री बनवत असतो. त्यासाठी अनेक वेळा तो आदिवासीच्या वस्तींमध्ये जात असतो. एकदा तो त्याच्यासोबत त्याची मुलगी अरु (ऋतुजा देशपांडे) ला घेऊन जातो. अरुला तिथल्या एका जंगलात एक पुस्तक मिळते. या पुस्तकामध्ये राक्षसाच्या तावडीतून राजकन्या राजाची सुटका कशी केली असते याची गोष्ट लिहिलेली असते. पण या पुस्कातील शेवटची काही पाने रिकामी असतात. हे पुस्तक घेऊन अरु मुंबईला परतते. पण मुंबईला आल्यानंतर काहीच दिवसात अविनाशला आदिवासींच्या वस्तीत परत जावे लागते. अविनाश काहीच दिवसांत तिथून परत येईल असे त्याने त्याची पत्नी इरावती (सई ताम्हणकर)ला सांगितलेले असते. पण त्याच दरम्यान त्या आदिवासी पाड्यातील भिला (उमेश जगताप) एका पोलिसाची हत्या करतो अशी बातमी मीडियात दाखवली जाते. ही बातमी ऐकल्यावर इरावती अविनाशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. पण अविनाशचा फोनच लागत नसल्याने ती अरुसोबत त्या आदिवासी पाड्यात जाते. तिथे गेल्यावर अरु आणि इरावती तिथल्या एका सर्किट हाऊसमध्ये राहात असतात. तिथून अरु रात्रीच्या वेळी जंगलात जाते आणि तिथे गेल्यानंतर अरुला एक म्हातारा (याकूब सैद) भेटतो. तो अरुला काही कोडी सोडवण्यासाठी सांगतो. ही कोडी सोडवल्यानंतर तुझ्या वडिलांना कोणत्या राक्षसाने पकडले आहे हे कळेल असे तो तिला सांगतो. त्यामुळे ती एक एक कोडी सोडवू लागते तर दुसरीकडे त्या गावात राहून इरावती परसू (विठ्ठल काळे) च्या मदतीने अविनाशचा शोध घेऊ लागते. अरु ती कोडी सोडवण्यात यशस्वी होते का तसेच अविनाश कुठे आहे हे इरावतीला कळते का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत.
राक्षस या चित्रपटात कथेच्या बाबतीत अनेक उणिवा आहेत. अरु जी कोडी सोडवते त्या कोड्यांची उत्तरे तिला नेहमीच सहजपण कशी भेटतात. तसेच ती इरावतीचा डोळा चुकवून सतत जंगलात कशी काय जाते या गोष्टी खटकतात. तसेच हा चित्रपट जादूचा आहे की या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता हेच कळत नाही. चित्रपटाचे पार्श्वसंगीत चांगले जमून आले आहे. पण चित्रपटाची सिनेमोटोग्राफी तितकीशी प्रभावी नाहीये. अरु ज्यावेळी जंगलातून फिरते, त्यावेळी जंगल म्हटले की थोडीशी भीती ही प्रत्येकालाच वाटणार. पण ही भीती कोणत्याच दृश्यात आपल्यात वाटत नाही. तसेच अरुच्या मनात देखील ती भीती आपल्याला पाहायला मिळत नाही. जंगल म्हटले की प्राणी हे असणार पण कोणत्याच प्राण्यांचा सामना अरुला करावा लागत नाही. तसेच अरु नेहमी ज्या गुंफेत जाते, ती गुंफा देखील भीतीदायक वाटत नाही. त्यामुळे अरू जंगलात नव्हे तर एखाद्या मॉल किंवा गार्डनमध्ये फिरून येते असेच आपल्याला वाटते. चित्रपटात जमेची बाजू ही सई ताम्हणकर आणि ऋतुजा देशपांडेचा अभिनय आहे. सईने इरावती ही भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारली आहे. तसेच चिमुकल्या ऋतुजाने देखील खूपच चांगले काम केले आहे. त्या दोघांच्या तुलनेत शरदच्या वाट्याला छोटी भूमिका आली आहे. त्यामुळे शरदला अभिनयासाठी खूपच कमी वाव मिळाला आहे. परसूच्या भूमिकेत असलेला विठ्ठल काळे नक्कीच लक्षात राहातो. सईच्या आणि अरुच्या अभिनयासाठी चित्रपट पाहायला हरकत नाही. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :