Prabho Shivaji Raja Movie Review : फसलेला अ‍ॅनिमेशनपट !

Prabho Shivaji Raja Movie Review : फसलेला अ‍ॅनिमेशनपट ! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - -
  • निर्माता - इन्फिनिटी व्हिज्युअल्स दिग्दर्शक - निलेश मुळे
  • Duration - 2 Hours Genre - Animation
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Prabho Shivaji Raja Movie Review : फसलेला अ‍ॅनिमेशनपट !

प्राजक्ता चिटणीस

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसणारे आपल्याला बोटांवर मोजण्याइतके लोक सापडतील. शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आपण लहानपणापासून ऐकल्या आहेत. तसेच आपण शालेय जीवनापासून त्यांचा इतिहास वाचला आहे. हाच इतिहास अ‍ॅनिमेशनच्या रूपात आपल्याला ‘प्रभो शिवाजी राजा’ या चित्रपटात पाहायला मिळतो. पण चित्रपटाला वेळेची मर्यादा असल्याने महाराजांच्या आयुष्यातील ठराविक गोष्टीच या चित्रपटात मांडल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पहिल्यांदाच अ‍ॅनिमेशनपट बनवण्यात आला आहे.

प्रभो शिवाजी महाराज या चित्रपटाची सुरुवात महाराजांच्या जन्माने होते. त्यानंतर त्यांनी जिंकलेला तोरणा किल्ला, अफजल खानाशी झालेली भेट, बाजी प्रभू देशपांडेचा पराक्रम, शिवाजी महाराजांनी शायस्ते खानाची कापलेली बोटे, सुरतची लूट, औरंगजेबसोबत केलेला तह, आग्य्रात औरंगजेबाच्या हातावर दिलेल्या तुरी, शिवाजी महाराजांचा अभिषेक अशा गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतात. 

प्रभो शिवाजी हा चित्रपट खूपच संथ वाटतो. तसेच अ‍ॅनिमेशनच्या बाबतीत या चित्रपटात अनेक उणिवा असल्याच्या जाणवतात. अ‍ॅनिमेशनमध्ये आपल्याला अजून खूप प्रगती करायची आहे असे हे चित्रपट पाहताना नक्कीच वाटते. चित्रपटात दाखवल्या गेलेल्या लढाया देखील खऱ्याखुऱ्या  वाटत नाहीत. युद्ध लढताना शिवाजी महाराजांचा जो आवेश असायचा तो चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. चित्रपटात गाणी उगाचच टाकल्यासारखी वाटतात. तसेच बॅकराऊंड म्युझिक देखील तितकेसे प्रभावी नाहीये. या चित्रपटाचे सूत्रधार सचिन खेडेकर आहेत. तसेच उमेश कामतने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. या दोघांचे आवाज प्रभावी वाटतात. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आजवर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. आणि या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतले आहे. पण, प्रभो शिवाजी राजा हा चित्रपट तितकासा प्रभाव पाडत नाही. शिवाजी महाराजांची गाथा नवीन पिढीला एका वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आलेला आहे. पण, हा चित्रपट पाहिल्यावर हा प्रयत्न अयशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :