मला काहीच प्रॉब्लेम नाहीः लोभसपणे विणलेला नात्यांचा गोफ...!

मला काहीच प्रॉब्लेम नाहीः लोभसपणे विणलेला नात्यांचा गोफ...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - गश्मीर महाजनी,स्पृहा जोशी,विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख
  • निर्माता - रिचा सिन्हा आणि रवी सिंघ दिग्दर्शक - समीर विद्वांस
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

मला काहीच प्रॉब्लेम नाहीः लोभसपणे विणलेला नात्यांचा गोफ...!

राज चिंचणकर
आजच्या काळातला 'प्रॉब्लेम' मांडतानाच संस्कार आणि परंपरांची कास धरत, दोन टोकांशी संधान साधणारी गोष्ट म्हणजे 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' हा चित्रपट आहे. गोष्टीतल्या व्यक्तिरेखांचा ठसठशीतपणा कसा असावा आणि त्या मनावर कशा बिंबवाव्यात याचे आश्वासक उदाहरण म्हणून या चित्रपटाकडे पाहता येईल. नातेसंबंधांचा नाजूक गोफ विणतानाच सद्यकाळातल्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आहे. हा प्रयत्न लोभस आहे आणि त्याचवेळी तो अंतर्मनाला स्पर्श करणारा आहे. 

पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा घरच्यांचा आग्रह मोडून, परिणामी त्यांचा रोष ओढवून घेत अजय व केतकी कोर्टात जाऊन लग्न करतात आणि त्यांचे त्यांच्या घरच्यांशी असलेले संबंध संपुष्टात येतात. दोघेही मुंबईच्या फास्ट लाईफमध्ये पुरते अडकले असल्याने, त्यांना एकमेकांसाठी व त्यांच्या छोट्या मुलासाठी वेळ काढता येत नाही. याचा परिणाम अजय व केतकीच्या वैवाहिक जीवनावर होतो आणि त्यांच्या परस्पर नात्यांचा पुन्हा एकदा शोध सुरु होतो. अशातच सात वर्षे उलटतात आणि अचानक त्या दोघांचे दुरावलेले कुटुंबिय पुन्हा त्यांच्या आयुष्यात डोकावतात. या घडामोडींमुळे अजय व केतकी यांचे आयुष्य अनपेक्षितपणे नव्याने अजमावले जाते. चित्रपटाची ही गोष्ट तशी छोटी आहे; परंतु तिला दिलेल्या गोड ट्रीटमेंटमुळे हा चित्रपट रंगत जातो. 

शहरातले ताणतणाव एकीकडे तर गावाकडचे संस्कारमय जीवन दुसरीकडे, अशा परस्परविरोधी टोकांशी नाते जुळवत पटकथा व संवादलेखक कौस्तुभ सावरकर आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी नातेसंबंधांचा हा गोतावळा उभा केला आहे. यातला नायक नागपूरचा; तर नायिका कोकणातली असल्याने, संस्कृतीतली भिन्नता मुळातच योजली गेली आहे. त्याचा परिणाम उत्तम कॉन्ट्रास्ट साधण्यासाठी झाला आहे. हे सर्व मांडताना दिग्दर्शकाची घट्ट पकड जशी जाणवते; तशीच प्रत्येक व्यक्तिरेखेवर त्याने घेतलेली मेहनतही स्पष्ट होते. या व्यक्तिरेखांच्या स्वभावाचा खोलात जाऊन केलेला विचार, त्यांना या गोष्टीत महत्त्वाचे स्थान मिळवून देतो. यात हृषीकेश-सौरभ-जसराज या संगीतकार त्रयीची कमालही दिसून येते. यातले कोकणी बाजाचे गाणे तर अफलातून असून, ते कानांत रुंजी घालत राहते. 

स्पृहा जोशी (केतकी)  गश्मीर महाजनी (अजय) यांची यात मस्त केमिस्ट्री जुळून आली आहे. स्पृहाने स्वतःच्या विचारांवर ठाम असलेली केतकी छान उभी केली आहे; तर काहीच मत न मांडण्याचा स्वभाव असलेला अजय साकारताना गश्मीरने चांगले ते देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रमुख व्यक्तिरेखांसह इतर कलावंतांनी त्या त्या भूमिकेचे जपलेले बेअरिंग उत्तम आहे. सतीश आळेकर, निर्मिती सावंत, विजय निकम, मंगल केंकरे ही यातली वडीलधारी चौकडी मनात ठाण मांडते. कमलेश सावंत, विनोद लव्हेकर यांची कामगिरीही छान आहे. सीमा देशमुख यांच्या वाट्याला छोटीशी; परंतु चित्रपटाच्या आशयावर प्रभाव टाकणारी अशी भूमिका आली आहे आणि ती त्यांनी लाजवाब साकारली आहे. नातेसंबंधांची वीण घट्ट करणारा आणि त्याचवेळी आजच्या पिढीलाही काही सांगू पाहणारा हा चित्रपट अनुभवण्यासाठी काही 'प्रॉब्लेम' असायची गरजच नाही. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :