Kaasav marathi movie review : आपली एक वेगळी छाप सोडणारा कासव

Kaasav marathi movie review : आपली एक वेगळी छाप सोडणारा कासव विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - आलोक राजवाडे, इरावती हर्षे, मोहन आगाशे, किशोर कदम , ओमकार घाडी, देविका दफ्तरकर
  • निर्माता - सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर दिग्दर्शक - सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर
  • Duration - १ तास ४५ मिनिटे Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Kaasav marathi movie review : आपली एक वेगळी छाप सोडणारा कासव

६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘कासव’ या मराठी चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवले असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आणि त्याचही या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर या जोडीने केले आहे. या जोडीने आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. 
सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याच डिप्रेशनवर आधारित कासव या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात दोन मुख्य पात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन पात्रांचा प्रवास म्हणजे कासव हा चित्रपट आहे. या चित्रपटात डिप्रेशनमध्ये असलेला मानव (आलोक राजवाडे) आपल्याला पाहायला मिळतो. आलोकने आत्महत्येचा प्रयत्न देखील केलेला आहे. मानव अचानक एकदा जानकीला (इरावती हर्षे) भेटतो. मानवची परिस्थिती पाहिल्यावर जानकी त्याची काळजी घेण्याचे ठरवते. पण तिला देखील मानसिक आजार असतो. तिची सगळे कुटुंब अमेरिकेत असते. तर ती एकटी राहात असते. ती कोकणात कासव संरक्षणाच्या एका प्रोजेक्टसाठी काम करत असते. त्याचवेळी तिची भेट समाजसेवक दत्ताभाऊ (मोहन आगाशे) यांच्यासोबत होते. मानव आणि जानकीची ओळख झाल्यानंतर त्याच्यात कशाप्रकारे सुधारणा होतात हे प्रेक्षकांना कासव या चित्रपटात पाहायला मिळते. 
कासव या चित्रपटातील अनेक दृश्य ही समजून घेण्यासारखी आहेत. अनेक वेळा दृश्यात काय आहे हे लगेचच कळत नाही. पण खोल विचार केल्यानंतर ती दृश्य खूपच चांगल्याप्रकारे आपल्याला कळतात. काही चित्रपट हे आपल्याला एका वेळात कळत नाहीत. ते चित्रपट सतत पाहिल्यानंतर त्या चित्रपटाचा खरा अर्थ आपल्याला उलगडायला लागतो. तसेच काहीसे कासव या चित्रपटाच्याबाबत आहे. या चित्रपटातील दिग्दर्शनासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. कारण या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत. मानव तर आपल्याला खूपच कमी बोलताना दिसतो. पण तरीही त्यांनी प्रत्येक दृश्य अतिशय सुंदरपणे उभे केले आहे. चित्रपटात संवाद कमी असले तरी चित्रपट पाहाताना आपल्याला कुठेही कंटाळा येत नाही. याचे श्रेय चित्रपटांच्या कलाकारांना देणे गरजेचे आहे. आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे यांनी त्यांच्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. या चित्रपटात कोकणचा परिसर टिपला असल्यामुळे हा चित्रपट पाहायला देखील तितकाच सुंदर आहे. एक चांगला चित्रपट पाहायचा असेल तर कासव आवर्जून पाहावा. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :