Hostel Days Movie Review:थोडी मजा,थोडी मस्ती...!

Hostel Days Movie Review:थोडी मजा,थोडी मस्ती...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव
  • निर्माता - श्री पार्श्व प्रॉडक्शन दिग्दर्शक - अजय नाईक
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Hostel Days Movie Review:थोडी मजा,थोडी मस्ती...!

राज चिंचणकर 

साधारण २०-२५ वर्षांपूर्वी इंटरनेटचा जमाना आपल्याकडे अवतरायचा बाकी होता. हाती मोबाईलच नसल्याने तेव्हाची तरुण पिढी सतत खाली मान घालून मोबाईल स्क्रीन्स धुंडाळत नव्हती. या तरुणाईचा तेव्हाचा जगण्याचा फंडा काही औरच होता. या सगळ्याच्या आठवणी जागवत त्या काळच्या धुंद जीवनाची सफर 'हॉस्टेल डेज' हा चित्रपट घडवतो. संगीतप्रधान कथेच्या व्याख्येत बसणारा हा चित्रपट तरुणाईची एक साधी सरळ कथा मांडतो. 

या चित्रपटातला काळ हा १९९४ चा आहे आणि त्याचे व्यवधान राखत ही कथा आकार घेते. सातारा येथील कोरेगावमधल्या नॅशनल कॉलेजचे हे हॉस्टेल आहे. स्थानिक नेते बाबासाहेब बुचकुळे यांनी मोठे डोनेशन दिल्याने त्यांचा या कॉलेजवर वरचष्मा आहे. देशभरातून इथे विद्यार्थी शिकायला आले आहेत. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना सुविधांच्या दृष्टीने डावलले जाण्याचा प्रकार हॉस्टेलमध्ये घडतो. डोनेशनच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आणि स्थानिक विद्यार्थी यांच्यात ठसन निर्माण होते. शिवा हा स्थानिक विद्यार्थी या हॉस्टेलचा जी.एस. आहे. त्याच्यात आणि बाहेरून आलेल्या जय या विद्यार्थ्यात काही कारणांनी संघर्ष निर्माण होतो. ईशानी ही इथल्या गर्ल्स हॉस्टेलची जी.एस. आहे. शिवाचे तिच्यावर प्रेम आहे. तर जयला सुद्धा तिचे आकर्षण आहे. दुसरीकडे या हॉस्टेलमध्ये अशा काही घटना घडत जातात की त्यामुळे शिवाचे अस्तित्व पणाला लागते. हा सगळा खेळ या चित्रपटात रंगवला आहे. 

अजय नाईक यांची कथा, पटकथा व दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आज वयाची चाळीशी ओलांडलेल्यांच्या भूतकाळावर फुंकर मारणारा आहे. त्यादृष्टीने त्यांनी जमवलेली ही भट्टी चांगली आहे. मात्र,या कथेत नाविन्य तसे अभावानेच आढळते. प्रेमत्रिकोण हा प्रकार चित्रपटांना नवीन नाही. तसेच दोन गटांतला संघर्षही तसा जुन्या पठडीतला आहे.डोक्याला फार काही ताण होऊ न देता, एक कथा मांडण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न चांगला आहे. आधुनिक काळातले तंत्रज्ञान हाताशी न घेता विणलेली कथा म्हणूनच १९९४ च्या काळाचा घेतलेला संदर्भ, यापुरतेच हे सर्व मर्यादित राहते. पण असे असले तरी करमणुकीचा धागा सुटू द्यायचा नाही, याची त्यांनी घेतलेली खबरदारीही दिसून येते. मुळातच संगीतकार असलेले अजय नाईक यांनी यात संगीताचा तडका दिला नसता तर ते नवलच ठरले असते. साहजिकच, १९९४ च्या काळात ज्यांची गाणी गाजत होती अशा कुमार सानू, शान, सोनू निगम आदी गायकांनी गायलेल्या गाण्यांची या चित्रपटात मुबलक पेरणी केली आहे.  चित्रपटाची लोकेशन्स आणि कॅमेरावर्क चांगले आहे.  

आरोह वेलणकर याला शिवाच्या प्रमुख भूमिकेत बक्कळ भाव खायला मिळाला आहे आणि या संधीचा चांगला उपयोग त्याने करून घेतला आहे. रंजकता पेरण्याचा वसा घेतल्याप्रमाणे यातली बुच्चन ही व्यक्तिरेखा अक्षय टंकसाळे याने त्याच्या खास स्टाईलमध्ये उभी केली आहे. ईशानीच्या भूमिकेत प्रार्थना बेहेरे हिने योग्य ते रंग भरण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. विराजस कुलकर्णी याचा जय ठीक आहे. रेक्टरच्या भूमिकेत संजय जाधव फिट्ट बसले आहेत. विद्याधर जोशी (बुचकुळे), देवेंद्र गायकवाड (सरपंच) यांच्यासह साईनाथ गानुवाड, गणेश बिरंगल व हॉस्टेलच्या इतर विद्यार्थ्यांची फळी मजबूत आहे. चित्रपटात आकर्षणाचा भाग असावा म्हणून काही कलावतींचा नेत्रसुखद तडकाही देण्यात आला आहे. थोडी मजा, थोडी मस्ती या पठडीत बसणारा हा चित्रपट निव्वळ करमणुकीच्या पातळीवर दखल घेण्याजोगा आहे. ज्यांनी हॉस्टेलचे दिवस अनुभवले आहेत; त्यांना या चित्रपटातून त्यावेळच्या आठवणींना उजाळा मिळू शकेल.     

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :