Halal marathi movie review: वाईट प्रथेवर योग्य भाष्य करणारा हलाल

Halal marathi movie review: वाईट प्रथेवर योग्य भाष्य करणारा हलाल विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर
  • निर्माता - अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे दिग्दर्शक - शिवाजी लोटन पाटील
  • Duration - २ तास ४८ मिनिटे Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Halal marathi movie review: वाईट प्रथेवर योग्य भाष्य करणारा हलाल

मागील काही दिवसांपासून तिहेरी तलाक हा मुद्दा विविध पातळ्यांवर चर्चिला जात आहे. पण विवाह आणि तलाक या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या भावनांचा कितपत आदर केला जातो हा विषय वादातीत आहे. शिवाजी लोटन पाटील यांनी ‘हलाल’ या आपल्या आगामी चित्रपटात याच ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. राजन खान यांच्या ‘हलाला’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात तिहेरी तलाकचा मुद्दा अधोरेखित करताना पाटील यांनी त्रिकोणी प्रेमकथेची किनार जोडली आहे.
अमोल कागणे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे यांनी अमोल कागणे फिम्ल्सच्या बॅनरखाली‘हलाल’ची निर्मिती केली असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कान फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवही गाजवले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हलालचा संवेदनशील विषय लक्षात घेत सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला पहिल्या फेरीतच बाद केले होते. सेन्सॉरच्या अडचणी पार केल्यानंतर या चित्रपटाला अनेक संघटनांच्या विरोधाचा सामनाही करावा लागला. पण आता हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. 
आजच्या आधुनिक काळातही मुस्लिम स्त्रिया बंधनांचा बुरखा झुगारण्यात अपयशी ठरत आहेत. तलाकसारख्या मुद्द्याच्या माध्यमातून आजही त्यांची वैचारिक गळचेपी सुरूच असल्याचा प्रत्यय येत आहे. या चित्रपटात सामाजिक बंधनांखाली स्त्रियांची केली जाणारी घुसमट मांडतानाच प्रेमकथेची सुंदर किनार दिग्दर्शकांनी या चित्रपटाला जोडली आहे. विवाह आणि तलाक या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लीम स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने याचा परिणाम त्यांच्या भावनांवर कशाप्रकारे होतो याचे परखड चित्रण हलालमध्ये करण्यात आले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांनी या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. उच्च निर्मितीमूल्य, सशक्त आशय, कलाकारांची यात खूप चांगली भट्टी जमून आली आहे. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :