गांभीर्य हरवलेला 'घंटा'नाद...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - अमेय वाघ, आरोह वेलणकर, सक्षम कुलकर्णी
  • निर्माता - आॅरस अवतार, श्लोकस्मित फिल्म्स दिग्दर्शक - शैलेश काळे
  • Duration - दोन तास Genre - थ्रिलर, कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

गांभीर्य हरवलेला 'घंटा'नाद...!

राज चिंचणकर
चित्रपट :  'घंटा'

अमेय वाघ, आरोह वेलणकर, सक्षम कुलकर्णी या युवा कलावंतांसह पुष्कर श्रोत्री, अनुजा साठे-गोखले, विजू खोटे, अभिजित चव्हाण, अरुण कदम, किशोर चौघुले, मुरली शर्मा, शिवानी सुर्वे अशी अनुभवी टीम चित्रपटात आहे म्हंटल्यावर बरेच काही हाती लागण्याची शक्यता अर्थातच वाढते. परंतु 'घंटा' या चित्रपटाने मात्र ही शक्यता फोल ठरवली आहे. अभिनयाची बाजू सांभाळणाऱ्या या टीमला यात जे काही करावे लागले आहे; त्याने मनोरंजन नव्हे, तर हाती केवळ या चित्रपटाचे 'शीर्षक' उरल्याचे समाधान मिळते. विनोदाची पेरणी करताना त्याबाबत पुरेसे गांभीर्य असणे आवश्यक असते; मात्र तिथेच गडबड झाल्याने हा 'घंटा'नाद हवा तितका वाजलेला नाही.  

       म्हटले तर राज, अंगद व उमेश या तिघा मित्रांची ही गोष्ट आहे आणि म्हटले तर इथूनतिथून गोळा केलेल्या मालमसाल्याची ही गोळाबेरीज आहे. हे तीन मित्र क्रिकेटच्या बेटिंगमधून पैसे कमावणारे आहेत. एका बेटिंगमध्ये त्यांना पाच लाखांचे नुकसान होते आणि ज्या चिंत्या नामक गुंडांकडून त्यांनी पैसे उधार घेतलेले असतात, तो या रकमेच्या परतफेडीसाठी त्यांना एका आठवड्याची मुदत देतो. त्यासाठी हे तिघे नाना प्रकार करतात. दुसरीकडे, एका कुरिअरमुळे होणारी गडबड, दिग्याभाई हा निवडणुकीला उभा राहणारा गुंड, हेगडे नामक एक व्यावसायिक आदींची एक 'स्टोरी' सोबतीला घेत आणि या तीन मित्रांची सांगड या सगळ्या उपद्व्यापाशी घालत ही 'घंटा' वाजत राहते. 

       गोंधळलेली कथा आणि पटकथेमुळे हा चित्रपट सैरभैर झाला आहे. बऱ्याच घटना एकत्र कोंबल्याने कथा व पटकथाकार सुमित बोणकर आणि राहुल यशोद यांची ही रेसिपी बऱ्यापैकी बिघडली आहे. दिग्दर्शक शैलेश काळे यांनी या रेसिपीला त्यातल्या त्यात चवदार करण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो तोकडा पडला आहे. विनोद ही सुद्धा गांभीर्याने घेण्याची बाब आहे, याचे विस्मरण झाल्याचे या चित्रटपटात दिसते. चित्रपटाच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध सुसह्य होत असला, तरी ही एकूणच भट्टी काही जमून आलेली नाही. बाकी छायांकन, संकलन आदी तांत्रिक बाजू मात्र जुळून आल्या आहेत. 

       अमेय वाघ (राज), आरोह वेलणकर (अंगद) आणि सक्षम कुलकर्णी (उमेश) या तिघांवर चित्रपटाचा फोकस आहे आणि दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला गोंधळ घालण्याचे काम या तिघांनी चोख पार पाडले आहे. पुष्कर श्रोत्री (दिग्याभाई), मुरली शर्मा (हेगडे) यांच्यासह किशोर चौघुले, अरुण कदम, अनुजा साठे-गोखले, विजू खोटे, अभिजित चव्हाण, शिवानी सुर्वे आदी कलाकारांनी 'अभिनया'ची आवश्यक ती भर घालण्याचे काम इमानेइतबारे केले आहे. एकूणच, डोके बाजूला काढून ठेवत एक रंगी'बेरंगी' विनोदी गोष्ट पाहायची इच्छा असेल, तर मात्र ही 'घंटा' वाजवायला हरकत नाही. 
 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :