अटींपलीकडे झेपावणारी हटके गोष्ट...!

अटींपलीकडे झेपावणारी हटके गोष्ट...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - सुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हणे, अतिशा नाईक, डॉ उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा
  • निर्माता - डॉ. संदेश म्हात्रे दिग्दर्शक - गिरीश मोहिते
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

अटींपलीकडे झेपावणारी हटके गोष्ट...!

राज चिंचणकर

मराठी चित्रपट हा त्यातल्या आशयघनतेवर खऱ्या अर्थाने चालतो असे म्हटले जाते आणि हे स्पष्ट असल्याने, विविध विषयांची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये झालेली लख्ख दिसते. कथेतला हा आशय उच्च दर्जाचा ठेवण्यासाठी तसा कथालेखक हाती असावा लागतो. आतापर्यंत विविध प्रांतात मुशाफिरी करत वेगळी वाट चोखाळणारे लेखक संजय पवार यांची कथा या चित्रपटासाठी आहे म्हटल्यावर त्यात विशेष काहीतरी असणारच; याविषयी दुमत होणे तसे कठीणच! साहजिकच, 'कंडिशन्स अप्लाय - अटी लागू' या चित्रपटात त्यांच्या लेखणीतून त्यांची खास अशी मुद्रा उमटली आहे. परिणामी, हा चित्रपट कुठल्याही अटींमध्ये न अडकता हटके गोष्ट मांडतो.  
       आगळीवेगळी कथा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचमुळे त्याचा ताजेपणा मन प्रफुल्लित करतो. हा विषय जरी 'लिव्ह इन' रिलेशनशिपवर बेतला असला, तरी त्याची मांडणी अनोख्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे एक सुखद आणि अनपेक्षित असा धक्का हा चित्रपट देऊन जातो. स्वरा ही एक रेडिओ जॉकी आहे. तिचे तरुण वय आणि तिचे कार्यक्षेत्र पाहता त्यासाठी लागणारा बिनधास्तपणा तिच्यात तेवढाच मुरलेला आहे. तर दुसरीकडे अभय हा मोटारी बनवणाऱ्या प्रख्यात कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. या दोघांमधली सामायिकता म्हणजे, त्यांना लग्न नको असते. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि ही 'रिलेशनशिप' पुढे जाऊन 'वर्क आउट' होते. पण हे सर्व काही सुरळीतपणे पार पडत नाही. बरीच वळणे आणि आडवळणे घेत ही कथा विशिष्ट अशा शेवटावर येऊन ठेपते.  
 
       आजच्या काळाची गरज म्हणा किंवा नाईलाज म्हणा; अशाप्रकारचा विषय घेऊन त्यावर चित्रपट करणे ही सहज बाब म्हणावी लागेल. कथा, पटकथा व संवादलेखक संजय पवार यांनी वर्तमानाला साक्ष ठेवून ही गोष्ट लिहिली आहे. साहजिकच, नव्या पिढीचे थेट प्रतिबिंब त्यात पडले आहे. ही कथा मांडताना दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी साधलेला कोन हटके आहे आणि त्यामुळे फ्रेश चित्रपट अनुभवायला मिळतो. पण हा चित्रपट फार खोलात जाऊन नातेसंबंधावर भाष्य मात्र करत नाही. कदाचित, त्यासाठी काही 'अटी' या मंडळींनी स्वतःलाच घालून घेतल्या असाव्यात. कृष्णा सोरेन यांचे छायाचित्रण, अविनाश-विश्वजीत यांचे समर्पक संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. 
 
       या चित्रपटाला फ्रेशनेस देण्यात आणि तो टिकवून ठेवण्यात, यात स्वरा रंगवणाऱ्या दीप्ती देवी हिचा मोलाचा वाटा आहे. अभिनयात दाखवलेला आत्मविश्वास आणि तिची उत्स्फूर्तता यामुळे हा चित्रपट उत्साही वाटतो. सुबोध भावे याने गाढ अनुभवाच्या जोरावर यातला अभय साकारला आहे. मिनार या त्याच्या मित्राच्या भूमिकेत अतुल परचुरे याने बराच भाव खाल्ला आहे. राधिका विद्यासागर यांची उर्मिला म्हणजे सहजाभिनयाचे उदाहरण म्हणावे लागेल. अनुष्काच्या छोट्याश्या भूमिकेत रेवती लिमये हिने ग्रेसफुल काम करत आश्वासक छाप पाडली आहे. मिलिंद फाटक, आतिशा नाईक, उत्कर्षा बिर्जे, राजन ताम्हाणे, विनीत शर्मा यांची लक्षवेधी साथ या चित्रपटाला लाभली आहे. एकूणच, विषय परिचित असला, तरी एक वेगळा अनुभव घ्यायचा असल्यास या चित्रपटाच्या 'अटी' स्वतःला लागू करून घ्याव्यात; म्हणजे कोणत्याही 'कंडिशन'मध्ये ही गोष्ट आपलीशी वाटून जाईल.  

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :