Baapjanma Movie Review : नेहमीचीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीने सांगणारा बापजन्म

Baapjanma Movie Review : नेहमीचीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीने सांगणारा बापजन्म विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा
  • निर्माता - सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुमतिलाल शाह दिग्दर्शक - निपुण धर्माधीकारी
  • Duration - 2 तास 1 मिनिटे Genre - फॅमिली ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Baapjanma Movie Review : नेहमीचीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीने सांगणारा बापजन्म

प्राजक्ता चिटणीस

आई-वडील म्हातारे झाले की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारी मुले-मुली आजकाल सर्रास पाहायला मिळतात. आपल्या छोट्याशा कुटुंबात अनेकांना आपले पालक नकोशे असतात. त्यामुळे ते त्यांना वृद्धाश्रमात तरी ठेवतात अथवा त्यांना एखादे वेगळे घर घेऊन देतात. काही वेळा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला आपल्या लहानपणी वेळ दिला नाही याचा राग देखील या मुलांच्या मनात असतो आणि त्यामुळे ते आपल्या आई-वडिलांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. याच विषयावर बापजन्म हा चित्रपट आहे. पण या चित्रपटात कोणताही मेलोड्रामा न दाखवता अतिशय मजेशीर रित्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी गोष्ट मांडली आहे.
भास्कर पंडित (सचिन खेडेकर) आपल्या नोकरीतून निवृत्त झालेले असतात. पत्नीच्या मृत्युनंतर एकट्यानेच आपले आयुष्य जगत असतात. विक्रांत (सत्यजित पटवर्धन) आणि वीणा (शर्वरी लोहोकरे) या त्यांच्या मुलांशी त्यांचा काहीही संपर्क नसतो. आपल्या डेली रुटिनमध्ये भास्कर पंडित खूप खूश असतात. त्यांच्यासोबत त्यांचा नोकर माऊली (पुष्कराज चिरपूटकर) आणि त्यांचा कुत्रा टायगर राहात असतो. त्यांच्या समोरच्या बंगल्यात आपटे नावाचे एक गृहस्थ राहात असतात. पण त्यांचा मुलगा बाजूच्या बंगल्यात राहूनही त्यांच्याकडे लक्ष देत नसतो. त्यामुळे भास्कर आणि माऊलीच त्यांची काळजी घत असतात. पण पंडित यांना कॅन्सर झाला असून वर्षभरात त्यांचा मृत्यू होणार असल्याचे त्यांना कळते. आपल्या शेवटच्या क्षणात आपल्या मुलांना भेटण्याची त्यांना ओढ लागते. ते मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न देखील करतात. पण त्यांची मुलगी वीणा म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही. मुलासोबत त्यांचे नाते तर अतिशय ताणलेले असल्याने त्याला संपर्क करण्याचा विचार ते डोक्यातूनच काढून टाकतात. त्याच दरम्यान त्यांच्या ओळखीच्या एका माणसाचा मृत्यू होतो. त्यांची मुले त्यांच्याशी कधीच संपर्कात नसतात. पण त्यांच्या मृत्यूनंतर ती मुले अंतिम दर्शनाला येतात. या घटनेबद्दल ऐकल्यावर आपल्यासोबत देखील असेच घडू नये असे सतत भास्कर पंडित यांना वाटत राहाते. आपल्या मुलांनी मरणाच्या आधी आपल्या घरात एकदा तरी यावे असे सतत भास्कर यांना वाटत असल्याने ते आपल्याच मरणाचे नाटक करतात आणि त्यानंतर पुढे काय काय गंमतीशीर घटना घडतात हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते.
वडील-मुलगा यांच्या नात्यावर आजवर अनेक मराठी चित्रपट बनवण्यात आले आहे. पण या सगळ्यात आपल्याला मेलोड्रामा पाहायला मिळाला होता. पण बाप-मुलाच्या नात्याची गंभीर गोष्ट मजेशीर रित्या निपुणने मांडली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांना दाद द्यायलाच हवी. या दोघांचे ट्युनिंग खूपच छान जमले आहे. भास्कर पंडित यांचा मृत्यू झाला हे त्यांच्या मुलांना माऊलीने कळवणे, पंडित यांचा घर ते स्मशानभूमी पर्यंतचा प्रवास हे प्रसंग चित्रपटात खूप छान जमून आले आहेत. अनेक दृश्यात आपल्याला खळखळून हसायला येते. निपुणचा हा पहिला चित्रपट असला तरी ते कुठेच जाणवत नाही. शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. मध्यांतरांनंतर चित्रपट थोडासा संथ होतो. तसेच काही प्रसंग उगाचच ताणल्यासारखे वाटतात. पण तरीही आजच्या पिढीने आपल्या वडिलांसोबत जाऊन चित्रपटगृहात पाहावा असा बापजन्म हा चित्रपट आहे.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :