aamhi doghi review : त्या दोघींची खास आणि भावनिक गोष्ट

aamhi doghi review : त्या दोघींची खास आणि भावनिक गोष्ट विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - मुक्ता बर्वे, प्रिया बापट, किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबालकर आणि प्रसाद बर्वे
  • निर्माता - व्हाइट स्वान स्टुडीओज दिग्दर्शक - प्रतिमा जोशी
  • Duration - २ तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

aamhi doghi review : त्या दोघींची खास आणि भावनिक गोष्ट

प्राजक्ता चिटणीस

आयुष्यात एखादे नाते आपल्याला अगदी जवळचे कधी वाटू लागते हेच आपल्याला कळत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेली व्यक्ती कधीतरी आपल्याला खूपच जवळची वाटू लागते. या व्यक्तिसोबत आपले बंध नकळतपणे जुळतात. आम्ही दोघी ही कथा देखील अशाच दोन व्यक्तींची आहे. या दोघी अचानकपणे एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि नकळतपणे या दोघांमध्ये ऋणानुबंध निर्माण होतात.
सावी (प्रिया बापट)च्या आईचे निधन झालेले असते. तिचा सांभाळ तिच्या वडिलांनी आप्पांनी (किरण करमरकर) केलेला असतो. तिला लहानपणापासूनच प्रॅक्टिकल विचार करायचा आणि इमोशनल व्हायचे नाही असे त्यांनी शिकवलेले असते. त्यामुळे ती अतिशय जिद्दी, आपले आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगणारी अशी होते. सावीच्या आईच्या निधनानंतर आप्पाने दुसरे लग्न करावे असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे असते. पण ते दुसऱ्या लग्नाला तयारच नसतात. पण सावी दहावीत असताना अचानक ते अम्मी (मुक्ता बर्वे)शी लग्न करतात आणि तिला घरी घेऊन येतात. सावीला आप्पांच्या लग्नाची काहीही कल्पना नसते. त्यामुळे तिच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का असतो. त्यात आप्पा त्यांच्या व्यवसायातच व्यग्र असल्याने त्यांनी सावीला कधीच वेळ दिलेला नसतो. तसेच सावी आणि तिच्या वडिलांमध्ये नेहमीच खटके उडत असतात. त्यामुळे तिला वडिलांचे कधीच प्रेम मिळालेले नसते. या परिस्थितीत अम्मी तिच्या आयुष्यात येते. अम्मी घरात आल्यानंतर काहीच दिवसांत सावी आणि अम्मीची चांगलीच गट्टी जमते. काही वर्षं अशीच उलटून जातात. सावीचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होते. वडिलांपासून सावीला नेहमीच दूर जायचे असते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याचदरम्यान तिची सगळ्यात जवळची मैत्रीण नेहा (आरती वडगबालकर) देखील लग्न करून मुंबईला गेलेली असते. त्यामुळे तिच्यासाठी मुंबईत राहाणे सोपे होते. मुंबईत आल्यानंतर काहीच वर्षांत तिच्या आयुष्यात राम (भुषण प्रधान) येतो आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळते. सावी रामच्या प्रेमात आकंठ बुडालेली असली तरी तिला लग्नाच्या बंधनात अडकायचे नसते. तिला लग्न या गोष्टीवर विश्वासच नसतो. सावी मुंबईत राहात असताना एक दिवस अचानक अम्मी तिच्या घरी येते. अम्मी मुंबईला येण्याचे कारण काय असते. ती आल्यानंतर सावीच्या आयुष्यात काय काय घडते, तसेच राम आणि सावीच्या नात्याचे पुढे काय होते हे प्रेक्षकांना आम्ही दोघी या चित्रपटात पाहायला मिळते.
गौरी देशपांडे यांच्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर आधारित आम्ही दोघी हा चित्रपट आहे. ही मूळ कथा छोटीशी असली तरी दिग्दर्शक प्रतिमा जोशीने ती खूप चांगल्या प्रकारे फुलवली आहे. प्रिया बापट आणि मुक्ता या दोघींनीही अभिनय दमदार केला आहे. पण काही दृश्यात मुक्ता भाव खाऊन गेली आहे. मुक्ताच्या वाट्याला कमी संवाद आले असले तरी तिने तिच्या डोळ्यातून अप्रतिम अभिनय केला आहे. सावी ही आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी असल्याने आजच्या पिढीला ती आपलीशी वाटते. किरण करमरकरने साकारलेले आप्पा देखील चांगलेच लक्षात राहातात. भुषण प्रधानची भूमिका छोटीशी असली तरी त्याने आपली एक छाप सोडली आहे. आरती वडगबालकरने देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. केवळ चित्रपटाच्या सुरुवातीला सावी आणि नेहा शाळेत असल्याचे दाखवण्यात आलेले होते. पण प्रिया आणि आरती या दोघीही शाळकरी मुली वाटतच नाही. तसेच चित्रपट काही वेळा खूपच संथ वाटतो. चित्रपटाची लांबी कमी करता आली असते असे चित्रपट पाहाताना जाणवते. कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे... हे गाणे खरंच सुंदर जमून आले आहे. एकंदर एक चांगली कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी आम्ही दोघी नक्कीच पाहा. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :