'व्हिडिओ पार्लर'ची पिफमध्ये निवड,चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित

यशापयश,प्रेम,अपमान,मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे.

'व्हिडिओ पार्लर'ची पिफमध्ये निवड,चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित
Published: 12 Jan 2018 10:16 AM  Updated: 12 Jan 2018 10:16 AM

'रंगा पतंगा' या पहिल्याच चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा पुढचा चित्रपट 'व्हिडिओ पार्लर' पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) निवडला गेला आहे.पिफमधील 'मराठी सिनेमा टुडे' या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.हृदया सिनेक्राफ्टचे डॉ. श्रीयांश कपाले  आणि ओम्स आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे यांनी ब्लिंग मोशन पिक्चर्सचे सागर वंजारी यांच्या सहकार्याने 'व्हिडिओ पार्लर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.अभिनेता संदीप पाठक,ओंकार गोवर्धन,कल्याणी मुळे,गौरी कोंगे,पार्थ भालेराव,रितेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केले आहे.सागर वंजारी यांनी संकलन,विजय नारायण गवंडे यांनी संगीत, पीयुष शहा यांनी साऊंड डिझाईन, देवेंद्र गोलतकर यांनी सिनेमॅटोग्राफी, नीलेश गोरक्षे यांनी कला दिग्दर्शन, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे.चित्रपट करण्यासाठी विषय शोधत दिग्दर्शक असलेला विक्रम त्याच्या मूळ गावी जातो.तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.व्हिडिओ पार्लरमध्ये तो ज्याच्याबरोबर चित्रपट पहायचा,त्या बालमित्राला वीस वर्षांमध्ये भेटलेला नाही.त्याचं यशापयश,प्रेम,अपमान,मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे.'व्हिडिओ पार्लर'विषयी दिग्दर्शक प्रसाद नामजोशी म्हणाले,'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात आमच्या चित्रपटाची निवड होणं आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने चित्रपट जाणकार प्रेक्षकांसमोर येणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटतो,याची उत्सुकता आहे.लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.'

पिफ महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे.या निवड झालेल्या चित्रपटांबद्दल बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, पर्यावरण ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून यावर्षीच्या महोत्सवासाठी आमच्याकडे जगभरातील ९५ देशांमधून तब्बल अकराशे चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. पैकी निवड समितीने २२५ अधिक चित्रपटांचा समावेश महोत्सावात करण्यात आला असून हे सारे चित्रपट या महोत्सावा दरम्यान चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :