​स्वप्निल करणार अवयवदान

स्वप्निल जोशीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा त्याचा वाढदिवस त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत जोरात साजरा केला. हा वाढदिवस स्वप्निलसाठी खूपच खास आहे. कारण काहीच महिन्यांपूर्वी स्वप्निलच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे.

​स्वप्निल करणार अवयवदान
Published: 19 Oct 2016 11:35 PM  Updated: 19 Oct 2016 06:05 PM

स्वप्निल जोशीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा त्याचा वाढदिवस त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत जोरात साजरा केला. हा वाढदिवस स्वप्निलसाठी खूपच खास आहे. कारण काहीच महिन्यांपूर्वी स्वप्निलच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. स्वप्निलने हा त्याचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी एक संकल्प केला आहे. अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचे आपण नेहमीच एेकतो. अनेक कलाकार लोकांना नेहमीच अवयव दान करण्याविषयी सांगत असतात. पण ते आपल्या खऱ्या आयुष्यात ही गोष्ट अंमलात आणत नाहीत. पण अभिनेता स्वप्निल जोशीने मरणोत्तर  फुफ्फुस, मुत्रपिंड आणि स्वादुपिंड दान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्याने त्याच्या वाढदिवसाला अवयवदानाचा फॉर्मदेखील भरला आहे. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत त्याच्या वाढदिवशी आम्ही स्वप्निलकर आणि टीम स्वप्निल या त्याच्या फॅन क्लबमधील अनेकांनीही अवयवदानाचा फॉर्म भरला. जवळजवळ 25 जणांनी नेत्रदान आणि त्वचादानचा निर्णय यावेळी घेतला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक चांगले कार्य करण्याची संधी मिळाल्याने स्वप्निल सध्या चांगलाच खूश आहे.
अवयवदान करणारा स्वप्निल हा पहिलाच कलाकार नाही. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या डोळ्यांवर सगळेच फिदा अाहेत. तिचे सौंदर्य तिच्या डोळ्यांमध्ये आहे असेच म्हटले जाते. ऐश्वर्यानेदेखील तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय अनेक वर्षांपूर्वीच घेतला आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :