6 गुण या चित्रपटात ​सुनील बर्वे आणि अमृता सुभाषची जमली जोडी

6 गुण या चित्रपटात ​सुनील बर्वे आणि अमृता सुभाष प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच अमृता आणि सुनील मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांनी याआधी झोका या मालिकेत एकत्र काम केले होते.

6 गुण या चित्रपटात ​सुनील बर्वे आणि अमृता सुभाषची जमली जोडी
Published: 12 Apr 2017 03:08 PM  Updated: 12 Apr 2017 03:08 PM

सुनील बर्वे आणि अमृता सुभाष यांची जोडी प्रेक्षकांना झोका या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेतील त्यांच्या जोडीचे चांगलेच कौतुक झाले होते. पण त्या दोघांनी कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले नाही. पण ते दोघे आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र झळकणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 6 गुण या चित्रपटात ते दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत झळकणार असून त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा आहे. शालेय मुलांवरील अभ्यासाचे दडपण आणि मुलांना समजून घेण्याची गरज हा विषय मांडत शिक्षण पद्धतीवर ६ गुण या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.
6 गुण या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. विद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत वाढलेला हा विद्या खूप हुशार आहे. मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे. नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या राजूची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी स्पर्धा, त्याच्या पालकांना येणारे दडपण, विद्याची मनोवस्था या सगळ्याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे. उज्ज्वला गावडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अशोक कोटियन आणि शीला राव या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. शीला राव यांनी याआधी बहुचर्चित "अस्तु" या चित्रपटाची निर्मिती केली होती.
'६ गुण' या चित्रपटात सुनील बर्वे, अमृता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून यातील एक गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे. 





पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :