स्पृहा जोशीचा हॉट अंदाज

आपल्या अभिनयाने आणि कवितेने अभिनेत्री स्पृहा जोशी हिने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. प्रेक्षकांची लाडकी ही अभिनेत्री नेहमीच तिच्या शांत, सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाली. मात्र आता या चौकटीतून बाहेर पडून तिने नुकताच सोशलमीडियावर एक हॉट फोटो अपलोड केला आहे.

स्पृहा जोशीचा हॉट अंदाज
Published: 04 Feb 2017 01:07 PM  Updated: 04 Feb 2017 01:07 PM

आपल्या अभिनयाने आणि कवितेने अभिनेत्री स्पृहा जोशी हिने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. प्रेक्षकांची लाडकी ही अभिनेत्री नेहमीच तिच्या शांत, सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाली. मात्र आता या चौकटीतून बाहेर पडून तिने नुकताच सोशलमीडियावर एक हॉट फोटो अपलोड केला आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रचंड पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तिला मिळालेल्या इतक्या कमेंन्ट आणि लाइक्स पाहून प्रेक्षकांसहित कलाकारदेखील अवाक झाले आहेत. तसेच संगीतकार अवधूत गुप्ते यानेदेखील स्पृहाच्या या हॉट लूकविषयी कमेंन्ट केली असल्याचे पाहायला मिळत आहे.  चाहत्यांना मात्र स्पृहाचा हा बोल्ड आणि हटके अंदाज पाहून नक्कीच धक्का बसणार यात शंकांच नाही. मात्र तिच्या या दिलेखेचक अदावर काही चाहते आनंदी असले तरी काहींनी निराशादेखील व्यक्त केली आहे. स्पृहाचा हा हॉट लूक कोणत्या चित्रपटासाठी आहे का अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. 
           
               स्पृहाने आतापर्यत मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. तिने मायबाप, मोरया, बायस्कोप, पैसा पैसा, लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच तिने अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका या मालिकेच्या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. त्याचबरोबर लहानपण देगा देवा, नेवर माइंड, नंदी अशा नाटकाच्या माध्यमातूनदेखील तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. तिचे सध्या डोण्ट वरी बी हॅपी हे नाटक लोकप्रिय आहे. या नाटकमध्ये ती अभिनेता उमेश कामतसोबत पाहायला मिळत आहे. तिच्या या नाटकाने परदेशातदेखील यश मिळविले आहे.    

                               


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :