सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे दिसणार तुला कळणार नाही या चित्रपटात

तुला कळणार नाही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे अशी नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे दिसणार तुला कळणार नाही या चित्रपटात
Published: 18 Jul 2017 03:16 PM  Updated: 18 Jul 2017 03:16 PM

बॉलिवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमँटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमातून राहुल आणि अंजली यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीत रोमँटिक चित्रपटांचा नवा पायंडा घालणारी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती आणि वितरण करणारे जीसिम्ससोबत स्वप्नील जोशी निर्माता म्हणून यापुढील प्रवासात कायम राहणार आहे. तसेच निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. 
मराठीतील या राहुल अंजलीच्या भूमिकेत कोण आहे, हे सध्या गुपितच ठेवण्यात आले असले तरी, सोशल नेटवर्किंग साईटवर नुकत्याच लाँच झालेल्या 'तुला कळणार नाही' या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. शिवाय हे आवाज रसिकांच्या परिचयाचे असल्याकारणामुळे मराठीतील हे राहुल- अंजली कोण आहेत? याचा अचूक तर्क आतापर्यंत सिनेरसिकांनी लावला आहे.
सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे या चित्रपटात प्रेक्षकांना राहुल-अंजलीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोनाली आणि सुबोधची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ही जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : सुबोध भावे का म्हणतोय ‘तुला कळणार नाही’?


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :