​सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे आणि संजय खापरे नगरसेवक या चित्रपटात

​सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे आणि संजय खापरे नगरसेवक या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात हे सगळेच कलाकार प्रेक्षकांना खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या चित्रपटातील नायक खलनायकांची जुगलबंदी ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असणार आहे. तसेच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे यांच्यादेखील प्रमुख भूमिका असणार आहेत.

​सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे आणि संजय खापरे नगरसेवक या चित्रपटात
Published: 20 Mar 2017 01:22 PM  Updated: 20 Mar 2017 01:22 PM

मराठीमध्ये आजवर निळू फुले, अशोक समर्थ, नागेश भोसले, सयाजी शिंदे यांनी खलनायक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे खलनायकही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आता नगरसेवक या चित्रपटात सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. जश पिक्चर्स प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक एक नायक या मराठी चित्रपटात सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे ही मंडळी दिसणार आहेत. हे सगळेच या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 31 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
प्रत्येक नेता हा अभिनेता असतो असे म्हणणाऱ्या दत्ता शिवलकरची भूमिका या चित्रपटात गणेश यादवने साकारली आहे तर सयाजी शिंदे या चित्रपटात भाऊ शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. भाऊ शेट्टी या चित्रपटात एका पक्ष प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुनील तावडे आमदार काळेच्या भूमिकेत तर बेरकी कार्यकर्त्याच्या भूमिकेत संजय खापरे दिसणार आहेत. या चित्रपटातील नायक खलनायकांची जुगलबंदी ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम करणार असून नगरसेवकमधील या खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोगी मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पाडवे, यश कदम, वर्षा दादंळे, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे आणि अभिजीत कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. तर या चित्रपटाचे छायांकन त्रिलोकी चौधरी यांचे असून संकलन सुबोध नारकर यांनी केले आहे. 

बाहुबली 2 पाहाण्यास उत्सुक आहात का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :