सरस्वती या मालिकेतील अक्षया हिंदळकर रॉकी चित्रपटात

सरस्वती या मालिकेतील अक्षया हिंदळकर रॉकी या मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सरस्वती या मालिकेतील  अक्षया हिंदळकर रॉकी चित्रपटात
Published: 19 Jun 2017 11:52 AM  Updated: 19 Jun 2017 11:52 AM

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नव्या चेहऱ्यांचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. सैराट या चित्रपटात आकाश ठोसर, रिंकू राजगुरू हे नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आज अनेक नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. 
अक्षया हिंदळकरने छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. ती छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. अक्षया आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रॉकी या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रूपात दिसणार आहे. संजना असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमके काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव रॉकी आहे.
‘सेवेन सीज्’ आणि ‘ड्रीम विव्हर’ प्रोडक्शन्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान शेख करत आहेत. आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. या चित्रपटातील प्रत्येकाकडून मला बरेच काही शिकायला मिळतेय. रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांचे तर संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथादेखील अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान तर संगीत समीर साप्तीस्कर, वसीम सदानी आणि इम्रान सदानी यांचे आहे.


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :