रणांगणातील युद्ध उतरतयं प्रेक्षकांच्या पसंतीस!

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या गोड जोडीचा 'रणांगण' हा चित्रपट नुकताच ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला असून चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्री तिकीट बुकिंग करून प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून येतो आहे

रणांगणातील युद्ध उतरतयं प्रेक्षकांच्या पसंतीस!
Published: 15 May 2018 10:55 AM  Updated: 15 May 2018 10:55 AM

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या गोड जोडीचा 'रणांगण' हा चित्रपट नुकताच ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला असून चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्री तिकीट बुकिंग करून प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून येतो आहे. तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी एकत्र रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणारं असून प्रथमच ते एकमेकांच्या विरोधी भूमिका पार पडताना दिसून येत आहेत. 

या चित्रपटातील रणांगण हे नात्यांमधील द्वंद्वाचं असलयामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरतं असल्याचे चित्रपट पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून समजते. नात्यांना लागलेला सुरूंग फोडून नात्यांची खरी बाजू मांडणारा श्लोक, आपल्या कुटूंबाची मानमरातब जपत असताना डावपेच रचणारे श्यामराव देशमुख आणि या एकंदर खेळात वेठीला धरलेलं त्यांचं कुटूंब... अशाप्रकारे कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांचं हृदयस्पर्शी चित्रण दिग्दर्शक राकेश सारंग दिग्दर्शित रणांगण या चित्रपटाची हवा सध्या सर्वत्र पसरलेली आहे.  

रणांगण चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच स्वप्नील 'श्लोक' या खलनायकाच्या भूमिकेत दिसून येतो आहे.चांगली वागणारी माणसं नकारी किंवा वाईट असूच शकत नाहीत, हा एक ठाम समज असतो. याउलट, कुठल्या तरी घटनेमुळे, प्रसंगामुळे चांगली माणसं वाईटाकडे वळली तर ती सगळ्यात जास्त दहशत निर्माण करतात. त्याच पद्धतीने स्वप्नीलची ही खलनायकी व्यक्तिरेखा या चित्रपटात रेखाटण्यात आली असल्यामुळे त्या भूमिकेस साजेसा असे त्याचे  लांब केस, वाढलेली दाढी, डोळ्यात दिसणारा रोष प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग ठरले आहेत. पूर्वीची रामानंद सागर यांच्या बासरी वाजविणाऱ्या कृष्णरुपी स्वप्नीलची एक वेगळी जागा आपल्या सगळ्यांच्याच मनात घर करून होती. आता बासरी हातात घेतलेला, खलनायकाच्या भूमिकेतील श्लोक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा कोपरा काबिज करताना दिसून येतो आहे.

निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.

तसं बघायला गेलं तर एखादी नवीन कलाकृती बनवणं सोपं असतं पण लाखों संगीतप्रेमींच्या मनात घर केलेल्या एखाद्या गाण्याचे काही शब्द घेऊन त्याभोवती तितक्याच ताकदीचं नवं गाणं गुंफणं एक आव्हान असतं. हेच आव्हान लिलया पेलत गुरू ठाकूर यांनी 'सख्या रे घायाळ मी हरिणी...' या अजरामर ओळींभोवती नवे शब्द ओवले तर राहुल रानडे यांनी आपलं संगीत कौशल्य वापरून त्या ओळींना गाण्याचं स्वरूप दिलं. तर हे सुंदर गीत आनंदी जोशी हीने आपल्या स्वरांनी सजवलं आहे. 

वास्तविक आयुष्यात सचिन पिळगांवकर यांना पितासमान मानणाऱ्या स्वप्नीलने चक्क त्यांच्या विरोधात पुकारलेल्या रणांगणातील या युध्दामागची नक्की कारणं काय? नवं पिढीतील अशा कोणत्या गूढ सत्याचा या चित्रपटात उलगडा होणार आहे? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट तुम्ही  ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण, आता युद्ध अटळ आहे!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :