​प्रेमा चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा

​प्रेमा चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत झाला. अभिनेत्री मानसी नाईकच्या हस्ते या चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली.

​प्रेमा चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा
Published: 14 Aug 2017 10:26 AM  Updated: 14 Aug 2017 10:26 AM

आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी सिनेमांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. प्रेमाचे वेगळे रूप दर्शवणारा प्रेमा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मार्कंडेय फिल्म प्रस्तुत रमेश व्यंकय्या गुर्रम निर्मित प्रेमा या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अभिनेत्री मानसी नाईकच्या हस्ते या चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताची झलक दाखवण्यात आली. सदानंद ज्ञानेश्वर इप्पाकायल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथासुद्धा त्यांचीच आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून हा युथफुल म्युझिक नजराणा प्रेक्षकांना निश्चित आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
या चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहिली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ हे ठसकेबाज आयटम साँग रेश्मा सोनावणे यांनी तर ‘दुनियेच्या आईचा घो’ हे जोशपूर्ण गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. ‘प्रेम सिंधू’ तसेच ‘तुझी आठवण का येते’ या दोन हृदयस्पर्शी गीतांना स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या आयटम साँगवर नृत्यतारका मानसी नाईक थिरकताना रसिकांना पाहायला मिळणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै, आतिष देवरुखकर यांनी केले आहे.
प्रेम जिंकण्यासाठी स्वत:मध्ये केलेला बदल आणि प्रयत्न यांची रोमहर्षक कथा म्हणजे प्रेमा. नारायण निर्वळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल, प्रेम नरसाळे, करिश्मा साळवी, संस्कृती शिंदे, प्रकाश धोत्रे, राज नरवडे, शेखर केदारी, संतोष चोरडिया, कस्तुरी सारंग, मनीषा तांबे, महादेव झोळ, सुरेखा कुडची या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सचिन दत्तात्रेय बत्तुल असून कार्यकारी निर्माते मंगेश रामचंद्र जगताप व मारुती तायनाथ आहेत.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :