पाहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे Inside Photo

'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी', 'मितवा'अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे रेशीमगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचं शुभमंगल नुकतंच गोव्यात पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.

पाहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे Inside Photo
Published: 16 Nov 2017 12:43 PM  Updated: 16 Nov 2017 12:43 PM

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा सनईचे सूर ऐकायला मिळाले. मनवा नाईक, क्रांती रेडकर, मृण्मयी देशपांडे, श्रृती मराठे, अक्षया गुरव, पल्लवी पाटील या अभिनेत्रींनंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकली आहे. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे रेशीमगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचं शुभमंगल नुकतंच गोव्यात पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.



या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. प्रार्थनाच्या लग्नाचे हेच फोटो अभिनेत्री प्रिया मराठे हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती प्रिया मराठेने शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.  या फोटोंमध्ये नववधू प्रार्थना बेहरेचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 





अभिषेक आणि प्रार्थना यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. मात्र प्रार्थना आणि अभिषेकमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यामुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.लग्नानंतर सिनेसृष्टीत काम सुरु ठेवणार असल्याचे प्रार्थना बेहरे हिने सांगितले. आगामी काळात हिंदी सिनेमांकडेही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे तिने ठरवले आहे.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :