‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न

मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत.

‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न
Published: 13 Mar 2018 01:06 PM  Updated: 13 Mar 2018 01:06 PM

मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत. आजवर आपण केवळ सिनेमांचे ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळयांबद्दल ऐकलं असेल, पण आता लघुपटांनाही असेसोहळे पाहण्याचं भाग्य लाभत आहे. ‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा ही जणू मराठीसिनेसृष्टीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याची चाहूलच म्हणावी लागेल. नॅविअन्स् स्टुडिओ प्रा. लि. या ब्यानरखाली तयार झालेल्या ‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर आणि पोस्टरलाँच सोहळा मुंबईतील एका हॉटेलमध्ये नुकताच मोठया थाटात संपन्न झाला. याप्रसंगी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते राजीव खंडेलवाल, निर्मात्या नम्रता बांदिवडेकर, दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, संदिप काळे, आलाप भागवत, समीर सामंत, यश खन्ना,आशिष म्हात्रे,व्हिव्हियन रिचर्ड्स, अनमोल भावे, प्रशांत राणे तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. आजवर बऱ्याच लघुपटांचं, जाहिरातींचं, माहितीपटांचं दिग्दर्शन, लेखन, संकलन, छायांकन करणाऱ्या नवज्योत बांदिवडेकर या तरूण दिग्दर्शकाने ‘क्वॉर्टर’चं दिग्दर्शन केलं आहे. नम्रता बांदिवडेकर या लघुपटाच्या निर्मात्या आहेत. 

‘क्वॉर्टर’च्या निमित्ताने  अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोलेने प्रथमच लघुपटात अभिनय केला आहे. हे या लघुपटाचं वैशिष्टय म्हणावं लागेल. वरवर पाहता ‘क्वॉर्टर’ या शीर्षकावरून या लघुपटाचा विषय आणि आशयाचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी फार थोडया वेळात यात बरंच काही सांगण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न नवज्योतने केला आहे. आजवर कधीही पडद्यावर न आलेल्या विषयावर लघुपट बनवायचाया ध्यासाने‘क्वार्टर’चं दिग्दर्शन केलं असल्याचं सांगत नवज्योत म्हणाला की, मानवी भावभावनांचं विश्वमोठया कॅनव्हासवर रेखाटताना लेखन, दिग्दर्शन,  अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सारं काही प्रवाहापेक्षा वेगळ देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. गिरीजासारख्या कसदार अभिनेत्रीने या प्रयत्नांना आपल्या अनुभवाची जोड दिल्याने ‘क्वॉर्टर’ एका वेगळयाच उंचीवर पोहोचल्याचं प्रेक्षकांनाही जाणवेल.

गिरीजाने ‘क्वॉर्टर’च्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर कमबॅक  केला आहे. मध्यंतरीच्या काळात गिरीजा केवळ छोटया पडद्यावरील जाहिरातींमध्येच दिसली, पण आता ‘क्वॉर्टर’च्या निमित्ताने ती मोठया पडद्याकडेही वळली आहे. ‘क्वॉर्टर’ बाबत गिरीजा म्हणाली की, हा माझा पहिलाच लघुपट असल्याने एक वेगळच फिलींग होतं. विशेष म्हणजे या लघुपटाची कथा आणि त्यातील माझं कॅरेक्टर खूप वेगळ आहे. मला एका वेगळयाच विश्वात नेण्याचं काम करणारा हा लघुपट रसिकांनाही एका नव्या जगताची सफर घडवेल अशी आशाही गिरीजाने व्यक्त केली. ‘क्वॉर्टर’ची कथा आणि संवादलेखन आलाप भागवत यांचं आहे. यश खन्ना यांनी छायांकनाचं काम पाहिलं आहे तर संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी केलं आहे. संगीत व्हिव्हियन रिचर्ड्सयांनी दिलं असून अनमोल भावे यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. संदिप काळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून प्रशांत राणे यांनी प्रॉडक्शन डिझाईन केले आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :