​ पोस्टर बॉईजचा लुक आऊट

मराठमोळ््या पोस्टर बॉय चित्रपटाचा आता हिंदी रिमेक अभिनेता श्रेयस तळपदे करणार हे तर सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटात आपल्याला देओल ब्रदर्स दिसणार असल्याचे देखील आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. आता या चित्रपटातील बॉबी देओल आणि सनी देओल यांचा लुक आऊट झाला आहे. सरकारी योजनांच्या कृपेने पोश्टरवर झळकलेले तीन चेहरे

​ पोस्टर बॉईजचा लुक आऊट
Published: 12 Dec 2016 07:26 PM  Updated: 12 Dec 2016 01:56 PM

मराठमोळ््या पोस्टर बॉय चित्रपटाचा आता हिंदी रिमेक अभिनेता श्रेयस तळपदे करणार हे तर सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटात आपल्याला देओल ब्रदर्स दिसणार असल्याचे देखील आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. आता या चित्रपटातील बॉबी देओल आणि सनी देओल यांचा लुक आऊट झाला आहे. सरकारी योजनांच्या कृपेने पोश्टरवर झळकलेले तीन चेहरे आणि त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य आयुष्यात घडलेले महाभारत अशा हलक्याफुलक्या कथेचा आधार घेत कुटुंब नियोजनाचा दिलेला संदेश यामुळे अभिनेता श्रेयस तळपदे याची निर्मिती असलेला पोश्टर बॉईज हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला होता. सर्वच स्तरातून चित्रपटाला मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादामुळे या पोश्टर बॉईजचा हिंदी रिमेकही काढण्याचा निर्धार श्रेयसने केला असून या चित्रपटाद्वारे तो  बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. चित्रपटातून अभिनय केल्यानंतर कंटाळा आला की मग दिग्दर्शन किंवा इतर गोष्टींकडे वळायचे, हा विचार आपल्याला पटत नाही. जे करायची इच्छा आहे ते आत्ताच केले पाहिजे, असे श्रेयसचे म्हणणे आहे. या चित्रपटात श्रेयससह सनी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार सनी देओल याने काही महिन्यांपूर्वीच घायल वन्स अगेन चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. पण, अभिनेता बॉबी देओलने काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. मात्र, आता हे दोन्ही भाऊ श्रेयच्या पोस्टर बॉईज या हिंदी चित्रपटात एकत्र पाहावयास मिळणार आहेत. पुण्यातील भोर तालुक्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचे कळते.  या चित्रपटातील सनी-बॉबीचा लुक सोशल साईट्सवर आऊट झाला आहे. यात निर्धास्त असा श्रेयस, पंजाब दा पुत्तर लूकमध्ये सनी आणि भोळ्या भाबड्या लूकमधील बॉबी दिसतो. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रॉडक्शन करणार आहे. प्रथमदर्शनी हे लूक पाहता मराठीतील पोश्टर बॉईज चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांची भूमिका सनी देओल, ऋषिकेश जोशीच्या भूमिका बॉबी देओल तर अनिकेत विश्वासरावची भूमिका श्रेयस तळपदे साकारणार असल्याचे दिसते. आता खरे काय हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :