प्रत्येक व्यक्तीला दहावी अणि बारावी हा करिअरचा उंबरठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लहानपणापासूनच या दोन्ही वर्षाची भिती घातली जात असते. त्यामुळे या दोन्ही वर्षी जास्त अभ्यास करून चांगले मार्क्स मिळविण्याचा प्रत्येकाचा प्ऱयत्न असतो. यात जर एखादा बालकलाकार असेल आणि त्याची दहावी आणि बारावीची परिक्षा असेल तर त्याला अभिनय आणि अभ्यास सांभाळून चांगले मार्क्स आणण्याचा प्ऱयत्न करावा लागतो. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका कलाकार पार्थ भालेराव हा देखील यंदा बारावीत आहे. तो ही आता बारावीच्या परिक्षेच्या तयारीला लागले असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगतिले. पार्थ सांगतो, हो, मी ही सध्या अभ्यासावर लक्ष कें द्रित केले आहे. बारावीच्या सुरूवातीपासून काही चित्रपटांच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र होतो. मात्र आता सगळया चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तसेच काही चित्रपटांच्या आॅफर्स पण येत आहे. सध्या या आॅफर्स नाकारत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. आताच काही दिवसांपूर्वी ए या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात माझ्यासोबत अभिनेता संतोष जुवेकर असणार आहे. या चित्रपटात मी विदयार्थीच्या भूमिकेत असणार आहे. तर संतोष याने आमच्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. मात्र आता फक्त अभ्यास चांगला करून चांगले मार्क्स आणण्याचा माझा प्ऱयत्न असणार आहे. परिक्षेनंतर मी पुन्हा अभिनय करण्यास तयार असल्याचेदेखील पार्थने यावेळी सांगितले. पार्थने यापूर्वी डिस्को सन्या, लालबागची राणी, तुकाराम, किल्ला असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच त्याने बॉलिवुडचा शहेनशाहा बिग बींसोबत तो भूतनाथ रिटर्न्समध्येदेखील पाहायला मिळाला होता.