मंगेश करतोय साऊथ अफ्रिकेत शूटिंग

अभिनेता मंगेश देसाईने त्याच्या अभिनयाची चुणूक अनेक चित्रपटांतून दाखविली आहे. सध्या मंगेश त्याच्या आगामी शॉर्ट फिल्मचे शूटिंगसाठी साऊथ आफ्रिकेत गेला आहे. नुकतेच त्याने याविषयी सोशल साईट्सवर लिहिले आहे फ्लाईंग टू साऊथ आफ्रिका, अ‍ॅन्ड शूट फॉर अ शॉर्ट फिल्म. बरे मंगेश फक्त शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठीच नाही तर 'एक अलबेला' या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी देखील तिकडे गेला आहे.

मंगेश करतोय साऊथ अफ्रिकेत शूटिंग
Published: 18 Oct 2016 09:45 PM  Updated: 18 Oct 2016 04:15 PM

 
       अभिनेता मंगेश देसाईने त्याच्या अभिनयाची चुणूक अनेक चित्रपटांतून दाखविली आहे. सध्या मंगेश त्याच्या आगामी शॉर्ट फिल्मचे शूटिंगसाठी साऊथ आफ्रिकेत गेला आहे. नुकतेच त्याने याविषयी सोशल  साईट्सवर लिहिले आहे फ्लाईंग टू साऊथ आफ्रिका, अ‍ॅन्ड शूट फॉर अ शॉर्ट फिल्म. बरे मंगेश फक्त शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठीच नाही तर 'एक अलबेला' या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी देखील तिकडे गेला आहे. मंगेशच्या एक अलबेला या चित्रपटाचे समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले होते. आता या चित्रपटाची स्क्रिनिंग थेट साऊथ आफ्रिकेला होते आहे. यासाठी मंगेश फारच उत्सुक आणि आनंदी आहे. त्याची ही शॉर्ट फिल्म कोणत्या विषयावर आहे किंवा कोण दिग्दर्शित करणार आहे या गोष्टींचा खुलासा तरी अजुन झालेला नाही. परंतु लवकरच प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत मंगेश या लघुचित्रपटाच्या निमित्ताने दिसणार आहे. तसेच विदया बालनसोबत एक अलबेला मध्ये स्क्रीन शेअर करून देखील मंगेश कुठेही कमी पडला नाही तर त्याने स्वत:ची छाप या चित्रपटात उमटविली आहे. एवढेच नाही तर आता लवकरच आपल्याला मंगेश मराठी देवदास या चित्रपटात देखील देवाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

    


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :