​माझा अगडबम या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

​माझा अगडबम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

​माझा अगडबम या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Published: 06 Sep 2017 12:36 PM  Updated: 06 Sep 2017 12:36 PM

तुला कळणार नाही या सुबोध भावेच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची जोडी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुबोधचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटानंतर सुबोध आता माझा अगडबम या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात त्याची जोडी तृप्ती भोईरसोबत जमणार आहे.
तृप्ती भोईरने 'अगडबम' या चित्रपटात वजनदार नायिकेची आव्हानात्मक भूमिका साकारली होती. माझा अगडबम हा याच चित्रपटाचा सिक्वेल असून तृप्तीनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
माझा अगडबम या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला काही रेसलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे रेसलर कुस्तीसाठी खऱ्या मराठ्याला आव्हान करत आहेत आणि रेसलर बनून तृप्ती लढायला जाते असे आपल्याला दिसत आहे. सुबोध या चित्रपटात तृप्तीच्या पतीच्या भूमिकेत असून त्या दोघांची खूप छान केमिस्ट्री या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. आपली पत्नी रेसलर आहे हे कळल्यावर चिडलेला पण त्यानंतर तिला दुखापत झाल्यानंतर तिची बाजू घेणाऱ्या पतीच्या भूमिकेत सुबोध दिसत आहे. या चित्रपटात या दोघांसोबतच उषा नाडकर्णी देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा ट्रेलर प्रेक्षकांना देखील खूप आवडत असून या ट्रेलरची चांगलीच चर्चा आहे.



'अगडबम'मध्ये तृप्तीसह मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्या दमदार भूमिका होत्या. तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम कथाविषयामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली होती. २०१०मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. तृप्ती भोईरने प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने साकारलेली नाजुका ही 'वजनदार' भूमिका हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. तिच्या त्या धाडसी भूमिकेचे त्यावेळी कौतुकही झाले होते. 
'अगडबम' हा प्रयोग त्या वेळी यशस्वी ठरल्यावर त्याचे पुढे काहीतरी करावे असे वाटत होते. त्यासाठीच माझा अगडबम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात असलेला चित्रपट साकारण्यासाठीच मी दिग्दर्शन करण्याचे ठरवले. अगडबमपेक्षाही माझा अगडबम हा चित्रपट भव्य आहे,' असं तृप्तीने सांगितले. 

Also Read : जाणून घ्या ​सुबोध भावेने कशी केली सोनाली कुलकर्णीची मदत


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :