आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये 'क्षितीज' भरारी

हैदराबाद येथे होत असलेल्या विसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्या सिनेमाची निवड झाली असून, कोलकाता इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'क्षितीज' ला नामांकन लाभले आहे.

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये 'क्षितीज' भरारी
Published: 07 Dec 2017 02:26 PM  Updated: 07 Dec 2017 02:26 PM

मराठी सिनेमा कात टाकतो आहे. नवीन आशय आणि संकल्पनेच्या जोरावर आतापर्यंत कित्येक मराठी सिनेमांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी घोडदौड केली आहे. या घोडदौडीत भारतातील सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या मराठी सिनेमांचादेखील समावेश होतो.  मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रॉडक्शन निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित 'क्षितिज... अ होरीझॉन' या सिनेमानेदेखील अशीच एक भरारी घेतली आहे. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निवडण्यात आलेल्या अंतिम ९ चित्रपटांमध्ये 'क्षितीज... 'ला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी युनेस्को गांधी अवार्डने सन्मानित करण्यात आले.शिवाय, यु.एस.ए. येथे झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल हॉस्टनमध्ये देखील या सिनेमाने बेस्ट फिचर अवार्डवर आपली मोहोर उमटवली आहे.तसेच याआधी झालेल्या केपटाऊन आंतरराष्ट्रीय फील्म फेस्टिवलमध्ये 'क्षितीज' सिनेमाची दखल घेत, दिग्दर्शक मनोज कदम यांना बेस्ट न्यू फिल्म डिरेक्टरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर,यू.एन.जिनीवा स्वित्झरलंड येथील ग्लोबल मायग्रेशन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या क्षितिजावरदेखील आपल्या मराठमोळ्या 'क्षितीज'ला महत्व प्राप्त झाले आहे.शिवाय हैदराबाद येथे होत असलेल्या विसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्या सिनेमाची निवड झाली असून, कोलकाता इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'क्षितीज' ला नामांकन लाभले आहे. तसेच मुंबईत होत असलेल्या थर्ड आय आशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील  हा सिनेमा दाखवला जाणार असल्यामुळे शिक्षणाचा संदेश देणा-या या सिनेमाचे महत्व आणखीनच वाढले आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांचे तर शैलेंद्र बर्वे यांचे पार्श्वगायन या सिनेमाला लाभले आहे.

सागर वंजारी दिग्दर्शित रेडू या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हॅट्रिक केली आहे. प्रतिष्ठेच्या तीन चित्रपट महोत्सवांसाठी हा चित्रपट निवडला गेला आहे. त्यात इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागासह कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इजिप्तमधील कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समावेश आहे. कैरो महोत्सवात इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागात रेडूची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. तसेच इफ्फीसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही या चित्रपटाची निवड झाली आहे.सागर वंजारीने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. 

RELATED ARTICLES


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :