केदार शिंदेंच्या आगामी सिनेमात झळणार एक नवी जोडी !

हलकीफुलकी आणि रसिकांना हवीहवीशी तसंच सा-या कुटुंबासह पाहता येईल अशी या सिनेमाची कथा असणार आहे.

केदार शिंदेंच्या आगामी सिनेमात झळणार एक नवी जोडी !
Published: 07 Aug 2017 10:41 AM  Updated: 07 Aug 2017 10:41 AM

केदार शिंदे यांचा नवीन मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.'रायबाचा धडाका' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून केदार शिंदे एक नवी जोडी रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'आल्हाद अंडोरे' आणि 'राधिका' अशी या कलाकारांची नावं आहे. केदार शिंदे यांनी शोधून काढलेली ही जोडी आगामी काळातील सुपरस्टार अशी जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. रायबाचा धडाका या सिनेमातील आल्हाद आणि राधिकाच्या लूकबाबतही सध्या कमालीची गुप्तता पाळली जात आहे. हे दोघंच नाही तर त्यांच्या सहकलाकारांविषयीसुद्धा फारसं ऐकायला मिळत नाही. लवकरच याचा खुलासा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 'रायबा' आणि 'शुभ्रा' यांच्या प्रेमाची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हलकीफुलकी आणि रसिकांना हवीहवीशी तसंच सा-या कुटुंबासह पाहता येईल अशी या सिनेमाची कथा असणार आहे. या सिनेमाच्या कथेला साजेशी आणि सिनेमाला फ्रेश लूक देण्याच्या उद्देशाने देखणी आणि तितकीच ग्लॅमरस, प्रफुल्लित अशी जोडी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शोधून काढली आहे. दक्षिणेकडील निर्मात्यांना मराठी सिनेमा आकर्षित करु लागले आहेत. तेलंगणाच्या हैदराबादस्थित तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या श्रीविजयासाई प्रॉडक्शननं आता मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. रायबाचा धडाका या सिनेमातून श्रीविजयासाई प्रॉडक्शन मराठीत एंट्री करत आहे. तेलुगू सिनेमाच्या भव्य यशाचा फॉर्मुला आजमावताना मराठी मातीतील मूल्य हरवली जाऊ नयेत याकडे या निर्मिती संस्थेचं विशेष लक्ष असणार आहे. मराठी सिनेमांचा इतिहास, रसिकांची आवड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन त्यांनी मराठीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. रायबाचा धडाका या सिनेमाला प्रसिद्ध डीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी लाभली आहे. पंकज पडघम यांचं संगीत या सिनेमाला लाभलंय.त्यामुळे रायबा आणि शुभ्राची रोमँटिक लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी रसिकांची उत्सुकताही शिगेला पोहचली असणार.  
 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :