'इफ्फी'त झळकणार हलाल

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. अनेक मराठी चित्रपट परदेशात प्रदर्शित होऊ लागले आहेत. कान्स फेस्टिव्हल, पुणे महोत्सव, गोवा महोत्सवयासारख्या विविध महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा तसेच राज्य पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेला हलाल सिनेमा आता

'इफ्फी'त झळकणार हलाल
Published: 19 Oct 2016 10:14 PM  Updated: 19 Oct 2016 04:44 PM

 
        मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. अनेक मराठी चित्रपट परदेशात प्रदर्शित होऊ लागले आहेत. कान्स फेस्टिव्हल, पुणे महोत्सव, गोवा महोत्सवयासारख्या विविध महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा तसेच राज्य पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेला हलाल सिनेमा आता 'इफ्फी'तही झळकणार आहे. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हलाल या सिनेमाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षापासून मराठी चित्रपट पाठवण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. यंदा याच धर्तीवर गोवा येथे होणाºया ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० चित्रपट निवडण्यात आले आहेत. हलाल चित्रपट मुस्लिम समाजातील रितीरिवाज आणि विवाहसंस्थेवर भाष्य करतो. तर कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये देखील हलालची स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. हलाल हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. आता 'इफ्फी'त ही हलाल आपला ठसा उमटवेल का हे आपल्याला लवकरच समजेल. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :