'वाघेऱ्या' सिनेमातले बोकड मरता मरता वाचले

ग्रामीण जीवनातील विनोद मांडणाऱ्या 'वाघेऱ्या' सिनेमाच्या पोस्टरवरील चष्माधारी बोकड सध्या खूप गाजत आहे. किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि ऋषिकेश जोशीबरोबर पोस्टरवर झळकत असलेल्या या बोकडाचीदेखील 'वाघेऱ्या' मध्ये प्रमुख भूमिका आहे.

'वाघेऱ्या' सिनेमातले बोकड मरता मरता वाचले
Published: 14 May 2018 09:30 AM  Updated: 14 May 2018 10:12 AM

ग्रामीण जीवनातील विनोद मांडणाऱ्या 'वाघेऱ्या' सिनेमाच्या पोस्टरवरील चष्माधारी बोकड सध्या खूप गाजत आहे. किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि ऋषिकेश जोशीबरोबर पोस्टरवर झळकत असलेल्या या बोकडाचीदेखील 'वाघेऱ्या' मध्ये प्रमुख भूमिका आहे. मात्र, हे बोकड मरता मरता वाचले असल्याची बातमी सूत्रांकडून आली. खरं तर, चित्रीकरणासाठी सेटवर आणलेले हे बोकड, संध्याकाळच्या जेवणासाठी मागवले असल्याचा समझ आचाऱ्यांचा झाला. त्यामुळे त्यांनी हे चष्मेबहाद्दर बोकड थेट स्वयंपाक घरात चालवले होते. इथे सेटवर चित्रीकरणाची सर्व तयारी झाल्यानंतर बोकड अचानक गायब झाल्याचे दिसले, आणि त्याचा सर्वत्र शोध सुरु झाला.

त्यादरम्यान, सिनेमातल्या वाघाला डांबण्यासाठी आणलेला हा बकरू स्वयंपाकघरात हलवला असल्याची खबर सेटवरील एका माणसाला कळली, आणि एकच धांदल उडाली. मग सगळ्यांनी धावतपळत जात बोकडाला तिथून बाहेर काढले, आणि त्यामुळे ते थोडक्यात बचावले. असे हे बोकड मग ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील संपूर्ण युनिट मेंबरचे लाडके बनले.

गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉईज'चे निर्माते सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे प्रस्तुत या सिनेमातला हा पडद्यामागील किस्सा जितका मजेशीर आहे, तितकाच मजेशीर पडद्यावरदेखील पाहता येणार आहे.  समीर आशा पाटील दिग्दर्शित 'वाघे-या' हा सिनेमा येत्या १८ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या सिनेमातल बोकड प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची खात्री आहे. 

'लांडगा आला रे आला' ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे.लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे,अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्या ऐवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल.अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे.'


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :